Indian Premier League 2023 Auction : आयपीएल 2023 च्या लिलावाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघांचे थिंक टँक लिलावात कोणत्या खेळाडूंवर फोकस करायचा याबाबत खलबत करत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने केकेआरची या लिलावात काय स्ट्रेटेजी असू शकते याबाबत आपले मत व्यक्त केले. रॉबिन उथप्पाच्या मते केकेआरला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक प्रवास करावा लागणार आहे. त्यांच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक होण्याची शक्याता आहे. त्यामुळे ते काही खेळाडूंसाठी बॅकअप प्लॅन तयार करतील.
रॉबिन उथप्पा म्हणाला की, 'केकेआर हा यंदाच्या लिलावात तीन खेळाडू बॅकअप म्हणून घेऊ शकतात. ते गुरबाजसाठी एक भारतीय विकेटकिपर बॅकअप म्हणून घेऊ शकतात. जर ते टीम साऊदी आणि लोकी फर्ग्युसन या दोघांनाही खेळवणार असतील तर विदेशी खेळाडूंमधला गुरबाज हा बेंचवर बसू शकतो. कारण केकेआऱ सुनिल नारायण आणि आंद्रे रसेल यांना बाहेर बसवू शकत नाही.'
उथप्पा पुढे म्हणाला की, 'आयपीएल आता जुन्या फॉरमॅटमध्ये परतणार आहे. त्यामुळे आता संघ दोनच मैदानावर खेळणार नसून त्याला अनेक ठिकाणी फिरावे लागणार आहे. केकेआर संघाला सर्वाधिक प्रवास करावा लागतो. त्यांना इतर संघापेक्षा जवळपास 2 ते 3 हजार किलोमिटर जास्त प्रवास करावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवून केकेआर आंद्रे रसेलसाठी बॅकअप खेळाडू यंदाच्या लिलावात घेतील. याचबरोबर ते शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवसाठी देखील एखादा भारतीय वेगवान गोलंदाज बॅकअप म्हणून घेऊ शकतात. केकेआरच्या ग्रुपमध्ये अनेक युवा गोलंदाज आहेत. मात्र ती ते जयदेव उनाडकटसारख्या खेळाडूवर देखली आपली बोली लावतील.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.