Video: ऑकलँडमध्ये चर्चा फक्त वस्त्रकारच्या 'त्या' षटकाराचीच

Pooja Vastrakar Hit Massive Six In Slog Over Against Australia
Pooja Vastrakar Hit Massive Six In Slog Over Against Australia esakal
Updated on

ऑकलंड : भारतीय महिला संघाला वर्ल्डकपची (ICC Women's World Cup) सेमी फायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी करण्याची गरज होती. आज ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताने (India Women vs Australia Women) दमदार बॅटिंग करत अर्धी लढाई तरी जिंकली. भारताकडून कर्णधार मिताली राजने 68 तर उपकर्णधार हरमनप्रीत कौरने 57 धावांची खेळी केली. मात्र या दोघींपेक्षा ऑकलँडवर चर्चा रंगली ती पूजा वस्त्रकारच्या (Pooja Vastrakar) 81 मिटर लांब षटकाराची.

Pooja Vastrakar Hit Massive Six In Slog Over Against Australia
INDW vs AUSW: मितालीने पाया घातला हरमनप्रीतने चढवला कळस

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि पूजा वस्त्रकार यांनी स्लॉग ओव्हरमध्ये (Slog Over) दमदार फलंदाजी केली. या दोघांनी आक्रमक फटके मारले. पूजा वस्त्रकारने 49 व्या षटकात एक जबरदस्त षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वस्त्रकारचा हा फटका थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन पडला. 81 मिटर लांब गेलेल्या या षटकारानंतर भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

Pooja Vastrakar Hit Massive Six In Slog Over Against Australia
Video: केकेआरचा सॅम बिलिंग्ज बोलतोय हिंदी; क्वारंटाईनचा सदुपयोग

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने अवस्था 2 बाद 28 अशी खराब सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर यस्तिका भाटिया (Yastika Bhatia) आणि कर्णधार मिताली राजने भागीदारी रचत डाव सावरला. या दोघींनी तिसऱ्या विकेट्स 130 धावांची दमदार शतकी भागीदारी रचली. यामुळे भारत दीडशेच्या पार गेला. मिताली राजने 96 चेंडूत 68 धावांची खेळी केली. तर यस्तिका भाटियाने 59 धावांची खेळी करून तिला चांगली साथ दिली.

Pooja Vastrakar Hit Massive Six In Slog Over Against Australia
PAK vs AUS : रावळपिंडीतील सामने आता लाहोरच्या मैदानात रंगणार

उपकर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तिने स्लॉग ऑव्हरमध्ये 47 चेंडूत नाबाद 57 धावांची आक्रमक खेळी केली. रिचा घोष आणि स्नेह राणा बाद झाल्यानंतर हरमनला पूजा वस्त्रकारने 28 चेंडूत 34 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांच्या धाडकेबाज फलंदाजीमुळे भारताने 50 षटकात 7 बाद 277 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून ड्रेसी ब्राऊनने 3 तर अॅलेना किंगने 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.