World Olympic Boxing Qualifiers : भारताच्या निशांत देवचा दमदार पंच; जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत आगेकूच

भारताच्या निशांत देव याने जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. त्याने ७१ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या मेडिव एस्करखान याच्यावर ५-० असा शानदार विजय मिळवला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Nishant Dev
Nishant DevSakal
Updated on

बुस्टो अर्सिजिओ (इटली) : भारताच्या निशांत देव याने जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. त्याने ७१ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या मेडिव एस्करखान याच्यावर ५-० असा शानदार विजय मिळवला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

निशांत देवच्या आक्रमक खेळापुढे मेडिव एस्करखान याचा निभाव लागला नाही. मेडिव एस्करखान याने टोकियो ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या खेळाची आशा केली जात होती.

दुसऱ्या फेरीत त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र निशांतच्या धडाकेबाज कामगिरीसमोर त्याचा पराभव झाला. निशांत देवचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना येत्या रविवारी होणार आहे.

अंकुशिता, संजीतचा पराभव

भारताच्या दोन बॉक्सर्सला पराभवाला सामोरे जावे लागले. अंकुशिता बोरो हिला ६६ किलो वजनी गटात, तर संजीत याला ९२ किलो वजनी गटात हार पत्करावी लागली. फ्रान्सच्या सोनविको एमिली हिने अंकुशिता हिचे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले. कझाकस्तानच्या एबेक ओरलबाय याने संजीतवर ५-० असा दमदार विजय साकारला. मोहम्मद हुसामुद्दीन याची लढत शनिवारी पहाटे रंगणार आहे. त्याच्यासमोर ज्यूड कॅलाघर याचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.