Praggnanandhaa : प्रग्नानंदच्या वडिलांना त्यानं बुद्धीबळपटू होऊ नये असं का वाटत होतं?

Praggnanandhaa Biography
Praggnanandhaa Biography esakal
Updated on

Praggnanandhaa Biography : भारताचा अवघ्या 18 वर्षाचा ग्रँडमास्टर प्रग्नानंद बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहचणारा भारताचा विश्वनाथन आनंद नंतरचा दुसराच बुद्धीबळपटू आहे. याचबरोबर बुद्धीबळ विश्वचषकातील फायनल खेळणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धीबळपटू देखील आहे.

सध्या त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला मॅग्नस कार्लसनचे मोठे आव्हान असणार आहे. जर हे आव्हान मोडून काढले तर प्रग्नानंद हा 21 वर्षानंतर बुद्धीबळ विश्वचषक जिंकणारा पहिला भारतीय ठरणार आहे. यापूर्वी ही कामगिरी फक्त विश्वनाथन आनंदला करता आली आहे.

Praggnanandhaa Biography
R Praggnanandhaa News: प्रग्नानंदच्या पाठीशी मातृशक्तीची ताकद; गॅरी कास्पारोवकडून आईचे कौतुक

वडिलांची इच्छा नव्हती मात्र...

प्रग्नानंदच्या घरातच बुद्धीबळ खेळलं जात होतं त्यामुळे तो बुद्धीबळाकडे वळणे हे स्वाभाविक होते. प्रग्नानंदचा जन्म हा तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये 10 ऑगस्ट 2005 मध्ये झाला. त्याचे वडील रमेशबाबू हे बँक कर्मचारी आहेत. तर त्यांची आई नागलक्ष्मी या गृहिणी आहेत.

रमेशबाबू हे पोलिओग्रस्त असल्याने त्यांची घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. प्रग्नानंदची मोठी बहीण वैशाली बुद्धीबळ खेळत होती. आपल्या बहिणीप्रमाणे प्रग्नानंदला देखील बुद्धीबळपटू होण्याची इच्छा होती. मात्र वडिलांना हे मान्य नव्हते. रमेशबाबू यांना प्रग्नानंदने देखील बुद्धीबळपटू होऊ नये असे वाटत होते. कारण दोघांच्या बुद्धीबळाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता.

Praggnanandhaa Biography
Chess World Cup final 2023 : प्रग्नानंदची नंबर वन कार्लसनला कडवी टक्कर, पहिला गेम ड्रॉ

लहानपणापासूनच बुद्धीबळाची आवड

मात्र प्रग्नानंदने त्याच्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत बुद्धीबळाचा पट मांडला. रमेशबाबूंनी नंतर कर्ज काढून दोघांच्या बुद्धीबळाच्या करिअरला पैसा पुरवला. प्रग्नानंद हा 5 वर्षाचा असल्यापासून बुद्धीबळ खेळतोय. त्याची बुद्धीबळाची आवड इतकी वाढत गेली की तो दिवसातून 4 ते 5 तास त्याचा सराव करू लागला.

प्रग्नानंद अवघ्या 10 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर देखील झाला होता. तर 12 व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टर होत इतिहास रचला. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याने लहान वयापासूनच खूप बक्षीसं मिळवली होती. मात्र 2015 मध्ये चेन्नईत आलेल्या भयानक पुरात त्याची काही बक्षीसं वाहून गेली होती.

प्रज्ञानानंदाने वयाच्या 5 व्या वर्षापासून बुद्धीबळ खेळ खेळायला सुरूवात केली. बुद्धीबळाची आवड ईतकी वाढत गेली की तो दिवसातून 4-5 तास सराव करायला लागला. आणि वयाच्या 10व्या वर्षी प्रज्ञानानंदा आंतरराष्ट्रीय मास्टरही झाला.

तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला. यासोबत भारतासाठी ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला. 2015 मध्ये चेन्नई मध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूर आला ज्यामध्ये त्याचे काही कप वाहून गेले होते. मात्र त्यानंतरही त्याने विजयी घौडदौड सुरूच ठेवली.

Praggnanandhaa Biography
Heath Streak : मी जिवंत...!, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी खोटी, जाणून घ्या प्रकरण

प्रग्नानंदला क्रिकेटचीही आवड

प्रग्नानंदला बुद्धीबळाबरोबरच क्रिकेट देखील आवडतं. तो टेबल टेनिस देखील खेळतो. याचबरोबर त्याला विनोदी चित्रपट खूप आवडतात. प्रग्नानंदच्या सुरूवातीच्या स्पर्धांमध्ये त्याच्यासोबत कायम त्याची आई नागलक्ष्मी असायची. अनेक जाणकारांच्या मते मॅग्नसवर 2022 मध्ये मिळवलेला विजय हा त्याच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. यानंतर त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास निर्माण झाला.

प्रग्नानंदची बहीण वैशाली देखील प्रसिद्ध बुद्धीबळपटू आहे. तिने इंडियन मास्टार आणि महिला ग्रँडमास्टर टायटल जिंकले आहे. प्रग्नानंदच्या कुटुंबाला सर्वात प्रथम बुद्धीबळाची ओळख वैशालीमुळेच झाली होती. वैशाली तासंतास टीव्हीवर बुद्धीबळाचे सामने पाहत होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.