Chess World Cup 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने 18 वर्षाच्या प्रग्नानंदचा रॅपिड फायरच्या पहिल्या गेममध्ये पराभूत करत वर्ल्डकपवर नाव कोरले. कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरले.
25 मिनिटाच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपले वजीर गमावला होता. प्रग्नानंद 19 मिनिटांपर्यंत पोहचला होता तर कार्लसन हा 14 मिनिटापर्यंत होता. कार्लसन हा पिछाडवीर गेला होता. यानंतर दोघांनीही 18 व्या चालीनंतर आपली क्वीन गमावली.
प्रग्नानंदने 25 व्या चालीपर्यंत आपली स्थिती सुधारली होती. आता त्यांच्याकडे फक्त 5 मिनिटे शिल्लक होती. पहिला टाय ब्रेकर गेम हा खूप टाईट झाला. 34 व्या चालीनंतर दोघांनीही आपला हत्ती गमावला होता. प्रग्नानंदच्या हातून वेळ निसटून चालली होती. अखेर पहिला रॅपिड गेम कार्लसनने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये दोघांनीही आक्रमक चाली रचल्या. दोघांचेही 10 चालीनंतर आपले घोडे गमावले होते. 14 व्या चालीपर्यंत कार्लसन चांगल्या स्थितीत होता. त्यानंतर दोघांनीही 18 व्या चालीत आपापल्या क्वीन गमावल्या. अखेर दुसरा गेम ड्रॉ झाली
फायनल सान्याबद्दल बोलायचं झालं तर प्रग्नानंद आणि कार्लसन यांच्यातील पहिले दोन क्लासिक गेम हे ड्रॉ राहिले होते.
पहिला गेम हा 35 चालीनंतर ड्रॉ राहिला होता. तर दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी 30 चालीनंतर हस्तांदोलन करत सामना ड्रॉ केला होता. दुसऱ्या गेममध्ये कार्लसन हा पहिल्यापासूनच ड्रॉसाठी खेळत होता.
प्रग्नानंद हा रॅपिड फेरीत चांगला खेळतो. त्याने सेमी फायलनमध्ये देखील रॅपिड फायर फेरीतच विजय मिळवत फायनल गाठली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.