Praggnanandhaa : गौरवास्पद! आर. प्रज्ञानंदने विश्वविजेत्या डिंग लिरेनचा केला पराभव! विश्वनाथन आनंदही टाकले मागे

Praggnanandhaa defeats world champion Ding Liren News :
Praggnanandhaa defeats world champion Ding Liren News Marathi
Praggnanandhaa defeats world champion Ding Liren News Marathi sakal
Updated on

R Praggnanandhaa Chess News : टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी केली आणि डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-1 भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.

Praggnanandhaa defeats world champion Ding Liren News Marathi
MS Dhoni : धोनीचा पाय गोत्यात! माहीविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

या विजयासह प्रज्ञानंदने विश्‍वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद FIDE च्या लाइव्ह रँकिंगमध्ये 11 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्याचे 2748.3 गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे. आनंदचे 2748.0 गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे.

Praggnanandhaa defeats world champion Ding Liren News Marathi
केरळ येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. 2016 मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या 10 वर्षे 10 महिन्यांत आर प्रज्ञानंदनी ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. आर प्रज्ञानंद चेन्नई, तामिळनाडू येथील आहेत. त्यांचा जन्म 2005 मध्ये झाला होता. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.