प्रीमियर लीगमधील (Premier League) वरिष्ठ खेळाडू कर्ट झोऊमा (Kurt Zouma) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. वेस्ट हॅम युनायटेडचा फुटबॉलपटू कर्ट या व्हिडिओत आपल्या पाळलेल्या मांजराचा छळ आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Cat Viral Video)
या व्हिडिओत 27 वर्षाचा झोऊमा या मांजराला मारण्यासाठी आपल्या घरात त्याच्या मागे लागल्याचे दिसते. तो या मांजराला फुटबॉलला जशी किक मारतो तशी किक मारत आहे. हा व्हिडिओ स्नॅपचॅटवर अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, झोऊमाने या व्हिडिओवरून टीका होऊ लागल्यानंतर आपल्या कृत्याची माफी मागितली. (Premier League Footballer Kurt Zouma Kick His Cat in house Video Gone Viral)
तो म्हणाला 'मला या घटनेचा खेद आहे. ते दोणी हा व्हिडिओ पाहून दुःखी झाले आहे त्यांची मी माफी मागतो. याचबरोबर मी सांगू इच्छितो की आमची दोन्ही मांजरं ठिक आहेत. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे या दोन्ही मांजरांवर खूप प्रेम आहे. ही एकमेव घटना होती यापुढे असे कोणतेही कृत्य होणार नाही.'
दरम्यान, कर्ट खेळत असलेल्या वेस्ट हॅम युनायटेडनेही (West Ham United) एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 'वेस्ट हॅम युनायटेड क्लब आमच्या खेळाडू कर्ट झोऊमाकडून झालेल्या कृत्याची निंदा करतो. आम्ही कर्ट बरोबर याबाबत बोललो आहोत. याबाबत अंतर्गत चौकशी देखील होईल. मात्र प्राण्यांच्या प्रती झालेल्या या निर्दयी कृतीचा निषेध करतो.'
झाऊमाच्या या कृत्याची बातमी देणाऱ्या द सनने या महागड्या जातीच्या मांजराने झाऊमाच्या घरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे झाऊमा चिडला मात्र त्याने या मांजरासोबत जे काही केले ते कधीही मान्य केलं जाऊ शकत नाही. कर्टने मांजराला फुटबॉलसारखी किक मारली. बूट फेकून मारला. विचारं मांजर घाबरून गेलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.