Prime Minister Narendra Modi Meets Indian Paralympians: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवास्थानी आज भारतीय पॅरा खेळाडूंची भेट घेत संवाद साधला आहे. यावेळी मोदींनी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांच्याकडून काही भेटवस्तू स्वीकारल्या. नेमबाज अवनी लेखराने पंतप्रधानांना पॅरालिम्पिक स्पर्धेतील जर्सी आणि ग्लोव्ह्ज भेट दिली. काहींनी मोदींची पदकावर स्वाक्षरी घेतली.
पंतप्रधान मोदीजी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले "पॅरालिम्पिकधील यश हे विशेष आणि ऐतिहासिक आहे. आमच्या अतुलनीय पॅरा-खेळाडूंनी २९ पदके जिंकल्याचा देशाला खूप आनंद झाला आहे. जी भारताची पॅरालिम्पिकमधील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे यश आमच्या खेळाडूंच्या बहूमुल्य समर्पण आणि लढाऊ स्वभावामुळे मिळाले आहे. त्यांच्या खेळातील कामगिरीने आम्हाला लक्षात ठेवण्याचे अनेक क्षण दिले आहेत आणि अनेक आगामी खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.”
भारताच्या या २९ पदकांमध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या २९ पदकांसह भारत पदकतालिकेत १८ वे स्थान मिळवले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने जिंकलेली ही सर्वाधिक पदके आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकले होती.
अवनी लेखरा (नेमबाजी) आणि सुमित अंतील (भालाफेक) यांसारख्या टोकियो सुवर्णपदक विजेत्यांनी आपले विजेतेपद कायम ठेवले आहे. नितेश कुमार (बॅडमिंटन), नवदीप सिंग (भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर नैन (क्लब थ्रो) ), आणि प्रवीण (उंच उडी) यांनी भारतासाठी प्रथमच पदके जिंकली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.