Olympic : 'क्या बात, क्या बात'... PM मोदींनी दिलं 'स्टॅडिंग ओवेशन' (VIDEO)

भारतीय ताफा स्टेडियमवर संचलन करत असताना मोदींनी उभे राहून टाळ्या वाजवत खेळाडूंना 'स्टॅडिंग ओवेशन' देत प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले.
PM Modi Cheer Athletes
PM Modi Cheer Athletes Twitter
Updated on

Olympic Stadium in Tokyo opening ceremony : जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. जगाच्या कानाकोपऱ्यातून आपपाल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत ऑलिम्पिक स्टेडियमवर (Olympic Stadium in Tokyo) उद्घाटन सोहळा पार पडला. भारताची महिला बॉक्सर एमसी मेरी कोम आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. (Prime Minister Narendra Modi stands up to cheer athletes as the Indian contingent enters Olympic Stadium in Tokyo opening ceremony WATCH Video)

पहिल्यांदाच भारताकडून महिला आणि पुरुष गटातून ध्वजवाहक निवडण्यात आला होता. या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताने स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा सोहळा पाहिला. भारतीय ताफा स्टेडियमवर संचलन करत असताना मोदींनी उभे राहून टाळ्या वाजवत खेळाडूंना 'स्टॅडिंग ओवेशन' देत प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन भारतीय संघ उद्घाटन समारंभातील कार्यक्रमात संचलन करतानाचा फोटो शेअर केलाय. आजपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होतेय. भारतीय खेळाडू स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त करत केजरिवाल यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघ ओपनिंग सेरेमनीच्या मार्चपोस्टमध्ये 21 व्या नंबरवर होता. 22 खेळाडू आणि 6 अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ध्वज फडकावत ग्रीसचा संघ सर्वात प्रथम स्टेडियममधून बाहेर आला. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 'eSwatini' राष्ट्राच्या खेळाडूंनी भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. हा स्पर्धेत सहभागी होणारा नवा देश नाही. दक्षिण अफ्रिकेतील स्थित स्वाझीलंड या देशाचेच हे नवे नाव आहे. या देशाने 2018 मध्ये नव्या नावाचा स्वीकार केलाय. याशिवाय चीन, ब्रिटन यासह अन्य देशातील खेळाडूही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.