Prithvi Shaw : शॉचा धुमधडाका! कसोटीत T20 च्या स्ट्राईक रेटने शतकी खेळी

Prithvi Shaw Aggressive Batting Duleep Trophy 2022
Prithvi Shaw Aggressive Batting Duleep Trophy 2022ESAKAL
Updated on

Prithvi Shaw In Duleep Trophy : पृथ्वी शॉने झळकावलेल्या दमदार शतकामुळे (140 चेंडूत 142 धावा) पश्चिम विभागाने मध्य विभागाविरुद्धच्या दुलीप करंडक उपांत्य सामन्यावर पकड घट्ट केली आहे. तिसऱ्या दिवशी पश्चिम विभागाने आपली आघाडी 350 धावांच्या पार पोहचवली आहे.

Prithvi Shaw Aggressive Batting Duleep Trophy 2022
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिका कधी सुरू होणार; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावात पाठोपाठ विकेट पडत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पश्चिम विभागाच्या 3 बाद 130 धावा झाल्या होत्या. त्यात पृथ्वी शॉच्या एकट्याच्या नाबाद 104 धावांचा मोठा वाटा होता.

आपली आक्रमक खेळी शॉने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील कायम ठेवत 140 चेंडूत 142 धावा ठोकल्या. मात्र त्याला करण शर्माने बाद करत दीडशतकी मजल मारू दिली नाही. पृथ्वी शॉने आपली धडाकेबाज खेळी तब्बल 15 चौकार आणि 4 षटकार यांनी सजवली. त्याने 101.43 अशा भन्नाट स्ट्राईक रेटने धावा केल्या.

पृथ्वी शॉला अरमान जाफरने 100 चेंडूत 49 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. सध्या शम्स मुल्लानी आणि हेत पटेल खेळत असून पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 5 बाद 254 धावा करत मध्य विभागावर 383 धावांची आघाडी घेतली आहे.

Prithvi Shaw Aggressive Batting Duleep Trophy 2022
Impact Player Rule: BCCI नियम बदलणार; सामन्यात आता 11 चा नाही तर 15 चा संघ?

पश्चिम विभागाचा पहिला डाव २५७ धावांवर संपुष्टात आला; परंतु त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी मध्य विभागाला जेमतेम सव्वाशे धावांत गुंडाळले. सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज उनाडकट आणि मुंबईचा तनुष कोटियन यांनी मध्य विभागाची दाणादाण उडवली. त्यांचा कर्णधार करण शर्मा सर्वाधिक ३४ धावा करू शकला.

याच कोटियनने पहिल्या डावात झुंझार ३६ धावांची फलंदाजी केली. शम्स मुलानीसह त्याने आठव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे पश्चिमेला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला.

रहाणे पुन्हा अपयशी पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. अवघ्या आठ धावांवर तो बाद झाला. पहिल्या डावातही त्याची खेळी १२ धावांची होती. दोन्ही वेळेस अंकित राजपूतने त्याच्या यष्टींचा वेध घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रहाणेने द्विशतक केले होते.

रहाणेप्रमाणे त्या सामन्यात द्विशतक करणारा यशस्वी जैसवालही अपयशी ठरला, त्यानंतर राहुल त्रिपाठी भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे पश्चिम विभागाचा संघ ३ बाद ८६ असा अडचणीत सापडला होता; परंतु पृथ्वीने ११ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १०४ धावा करून संघाचा डाव सावरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.