Prithvi Shaw Duleep Trophy : अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती पृथ्वी आला संघासाठी धावून, सर्वांकडून होतयं कौतुक

Prithvi Shaw Duleep Trophy
Prithvi Shaw Duleep Trophy esakal
Updated on

Prithvi Shaw Duleep Trophy : दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यातील दुलीप ट्रॉफी 2023 चा अंतिम सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. पश्चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दक्षिण विभागाचा पहिला डाव 213 धावात गुंडाळला.

मात्र आव्हानात्मक खेळपट्टीवर पश्चिम विभागाची देखील सुरूवात साधारणच झाली. सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आव्हानात्मक परिस्थिती पृथ्वीने केलेल्या या खेळीचे सर्वजण कौतुक कर आहेत.

Prithvi Shaw Duleep Trophy
Ishan Kishan Test Debut : इशान किशनची पदार्पणाच्या कसोटीतच 'धोनीगिरी', यशस्वी सोडाच विराटलाही दिला आदेश

पृथ्वी शॉने 65 धावांची केली खेळी

पृथ्वी शॉने दक्षिण विभागाविरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 65 धावांची खेळी केली. त्यात त्याने 9 चौकार देखील मारले. त्याने 101 चेंडूत 65 धावा केल्या तर 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याच्या जोडीला आलेल्या प्रियांक पांचालला फक्त 11 धावा करता आल्या. त्यानंतर आलेला हार्विक देसाई 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पश्चिम विभागाची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती.

Prithvi Shaw Duleep Trophy
'WTC Final वेळीच मी तयार होतो पण..', विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत अश्विनने टीम मॅनेजमेंटला दाखवला आरसा

हनुमा विहारीने केल्या 63 धावा

पहिल्या डावात दक्षिण विभागाने 213 धावा केल्या. दक्षिण विभागाचा कर्णधार हनुमा विहारीने झुंजार खेळी करत 130 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 63 धावा केल्या होत्या. विहारी सोबत तिलक वर्माने देखील संघासाठी 40 धावांचे योगदान दिले होते. मयांक्र अग्रवाल मात्र 28 धावा करून बाद झाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.