Prithvi Shaw : 'टीम इंडियात पुनरागमन करण्यावर माझे लक्ष नाही...' शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य

No expectations for India comeback right now Prithvi Shaw : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून शानदार शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉने केले मोठे वक्तव्य
Prithvi Shaw Marathi News
Prithvi Shaw Marathi Newssakal
Updated on

Prithvi Shaw Statement on Comeback Team India : युवा सलामीवीर पृथ्वी शॉने प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत तुफानी शतक ठोकले. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने शानदार शतक झळकावले.

या शानदार खेळीनंतर पृथ्वी शॉने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, सध्या मी भारतीय संघात पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही. त्याच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.

Prithvi Shaw Marathi News
IPL 2023 : 'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा...' विजयानंतर धोनीच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

युवा फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. आणि रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण मोसमातून तो बाहेर पडेल असे सर्वांना वाटत होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शतकही केले. पृथ्वी शॉने 185 चेंडूत 159 धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

Prithvi Shaw Marathi News
Ranji Trophy : 0, 0, 16, 8, 9, 1... कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद; आकडेवारीने उडाली खळबळ

पृथ्वी शॉच्या मते सध्या तो केवळ रणजी ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करत आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मी फार पुढचा विचार करत नाही आणि मला वर्तमानात जगायचे आहे. माझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. मी पुन्हा क्रिकेट खेळू शकलो याचा मला आनंद आहे.

पुढे तो म्हणाला, मी नुकताच दुखापतीतून पुनरागमन केले आहे. आणि मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. सध्या टीम इंडियात पुनरागमन करण्यावर माझे लक्ष नाही, तर मुंबईसाठी रणजी करंडक जिंकणे हे माझे लक्ष्य आहे. त्यासाठी मला शक्य तेवढे योगदान द्यायचे आहे.

Prithvi Shaw Marathi News
U-19 WC Ind vs Aus Final : रोहित शर्माचे स्वप्न उदय पूर्ण करणार? WTC, ODI वर्ल्डकपनंतर आता U-19 च्या फायनलमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

शेवटी तो म्हणाला की, मला चांगली कामगिरी करायची होती, पण कुठेतरी माझ्या मनात विचार येत होता की मी पुन्हा माझ्या शैलीत फलंदाजी करू शकेल का? मनात अनेक विचार चालू होते. पण काही तासांनंतर परिस्थिती सामान्य झाली.

पृथ्वी शॉ गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे कपदरम्यान जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो मैदानाबाहेर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.