Prithvi Shaw Controversy : प्रकरण संपलं नाही! सपनाची नवी तक्रार, लावलं विनयभंगाचं कलम

Prithvi Shaw Selfie Controversy
Prithvi Shaw Selfie Controversyesakal
Updated on

Prithvi Shaw Selfie Controversy : पृथ्वी शॉ आणि भोजपूरी अभिनेत्री सपना गिल यांच्यातील सेल्फी वादात सपना गिलला न्यायालीयन कोठडी देण्यात आली. हा पृथ्वी शॉचा विजय मानला जात असला तरी त्याची या प्रकरणातील डोकेदुखी काही कमी झालेली नाही. सपना गिलने पृथ्वी शॉ विरूद्ध outrage of modesty ची नवीन तक्रार दाखल केली आहे. यात विनभंगासंदर्भातील एक कलम देखूल असून याचबरोबर पृथ्वी शॉवर तब्बल 10 आयपीसी कलमे लावली आहेत.

पृथ्वी शॉवर आयपीसीच्या कलम 34 , 120B (गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान), कलम 146, कलम 148, कलम 149, कमल 323, कलम 324, कलम 351, कलम 354 (एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे) आणि कलम 509 या कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Prithvi Shaw Selfie Controversy
KL Rahul : केएल राहुलला डच्चू मात्र नवा उपकर्णधार कोण होणार? BCCI समोर आहेत हे 3 पर्याय

पोलिसांनी या प्रकरणी 17 फेब्रुवारीला समना गिलला पृथ्वी शॉवर हल्ला करणे आणि त्याच्या मित्राची गाडी फोडणे या आरोपाखाली अटक केली होती. ही घटना 15 फेब्रुवारीला हॉटेल सहारा स्टार कॅफे येथे घडली होती. शॉन गिलसोबत दुसऱ्यांदा सेल्फी काढण्यास नकार दिल्यानंतर सपना गिल आणि तिच्या मित्राने शॉवर हल्ला केला. होता.

याचबरोबर शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने गिल आणि तिच्या मित्रावर हल्ला करणे आणि गाडी फोडल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अशिवारा पोलीस ठाण्यात गिल आणि इतर 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Prithvi Shaw Selfie Controversy
Jack Hobbs : 50, 100 नाही तब्बल 199 शतकं! 'द मास्टर' सारखा कारनामा सचिन - विराटलाही जमला नाही

या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. पोलिसांनी गिल आणि इतर तिघांवर आयपीएसी 143, 148, 149, 384, 437, 504 आणि 506 या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

हे सर्व गुन्हे हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने गिलला सोडून दिले. मात्र आता गिलने नवी तक्रार दाखल केली आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.