Prithvi Shaw : भारताचा वनडे संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी भारताने आपला ज्युनिअर संघ मैदानात उतरवला आहे. मुख्य संघ हा टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. दरम्यान, या ज्युनिअर संघात मुंबईचा धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉची निवड करण्यात आलेली नाही. पृथ्वी शॉनो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी केली आहे. तो आपल्या फिटनेसवर देखील काम करतोय तरी देखील त्याला वनडे संघात स्थान मिळालेले नाही.
पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून भारतीय संघातून दूर आहे. कधीकाळी सचिन तेंडुलकरशी तुलाना होणाऱ्या पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय तरी देखील निवडसमितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच पृथ्वी शॉ निराश झाला आहे. त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसवर देखील काम केले आहे.
पृथ्वी शॉने दिलीप ट्रॉफीमध्ये दोन शतके ठोकली. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला वनडे संघात स्थान मिळाले नाही.
यानंतर पृथ्वी शॉ म्हणाला की, 'मी खूप निराश होतो. मी कष्ट करतोय धावा देखील करतोय तरी मला संधी मिळत नाहीये. मात्र माझी कोणतीही तक्रार नाही. कारण ज्यावेळी राष्ट्रीय निवडसमितीला वाटेल की मी तयार आहे त्यावेळी ते मला नक्की बोलावतील. मला जिथे संधी मिळेल तिथे मी माझे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.'
पृथ्वी शॉने वजन देखील केलं कमी
पृथ्वी शॉने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी फलंदाजीत फारसा बदल केलेला नाही असे सांगितले. तसेच तो म्हणाला की, 'मी माझ्या फलंदाजीत फार बदल केलेले नाहीत. मात्र मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं आहे. मी वजन कमी केलं आहे. आयपीएलनंतर मी जवळपास 8 किलो वजन कमी केलं आहे. मी आता जीममध्ये खूप वेळ घावलतो. मी माझ्या खोलीतच असतो. लोकांशी भेटीगाठी कमी केल्या आहेत. आरशासमोर उभे राहून स्वतःशीत बोलत असतो. मला हे कोणी सांगितले नाही मात्र माझ्यात सुधारणा करण्यासाठी मी असं करत आहे.'
पृथ्वी शॉने भारताकडून शेवटचा कसोटी सामना 2020 मध्ये खेळाला होता. तर शेवटचा वनडे सामना 2021 मध्ये खेळला होता. या वर्षी पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी आणि इंडिया ए कडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. तरी देखील त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.