Prize Money World Cup 2023 : ICC ने वर्ल्ड कप 2023 साठी बक्षीस रक्कम केली जाहीर, विजेत्यावर होणार कोटींचा वर्षाव

icc cricket world cup 2023
icc cricket world cup 2023
Updated on

Prize money announced for ICC Men’s Cricket World Cup 2023 : येत्या पाच ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकाची रंगत पाहायला मिळणार आहे. आयसीसीकडून शुक्रवारी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्यानुसार या स्पर्धेमध्ये विजेता होणाऱ्या देशावर ३३.२४ कोटी रुपयांचा वर्षाव होणार आहे. उपविजेत्या देशाला १६.५८ कोटी रुपयांची कमाई करता येणार आहे.

भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान विश्‍वकरंडक खेळवण्यात येईल. भारतातील दहा ठिकाणी या स्पर्धेतील लढती पार पडणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल ८३.१० कोटी रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत.

icc cricket world cup 2023
ICC ODI World Cup 2023 : भारतातील वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाला अजून मिळाला नाही व्हिसा; संघाची दुबई वारी झाली रद्द

एकदिवसीय विश्‍वकरंडकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाला विशिष्ट रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन देशांना प्रत्येकी ६.६३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच साखळी फेरीत बाद होणाऱ्या सहा देशांना प्रत्येकी ८२.९४ लाख रुपये मिळणार आहेत. प्रत्येक सामना जिंकणाऱ्या देशाला ३३.१७ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

बक्षिसांमध्ये बदल नाही

मागील एकदिवसीय विश्‍वकरंडक इंग्लंडमध्ये पार पडला होता. २०१९ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्येही ८३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात आली. तसेच विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या संघावर ३३ कोटी रुपयांचा वर्षाव करण्यात आला होता. यंदाही बक्षिसाची रक्कम एकसारखीच ठेवण्यात आली आहे. २०१९ व २०२३ या वर्षांमधील दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

icc cricket world cup 2023
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेचे आज औपचारिक उद्‌घाटन

दरम्यान, मागील तीन एकदिवसीय विश्‍वकरंडक यजमान देशांनी जिंकले आहेत. २०११मध्ये भारतीय संघाने, तर २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक पटकावला. २०१९मध्ये इंग्लंडने बाजी मारली. यंदा भारताकडे यजमानपद आहे. हा योगायोग दिलासा देणार आहे.

टी-२० विश्‍वविजेत्याला १३ कोटींचे बक्षिस

२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इंग्लंडने विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला होता. त्यावेळी इंग्लंडला बक्षिसाच्या रूपात १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये देण्यात आले होते. उपविजेत्या पाकिस्तानच्या संघाला ६ कोटी ५२ लाख व ६४ हजार प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.