Pro Kabaddi 11 Auction: चिपळूणचा शुभम शिंदेही झाला लखपती, दुसऱ्यांदा पटना पायरेट्सकडून खेळणार

Shubham Shinde Pro Kabaddi: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचा लिलाव मुंबईत सुरू असून चिपळूणच्या शुभम शिंदेलाही मोठी बोली लागली.
Shubham Shinde | Pro Kabaddi 11
Shubham Shinde | Pro Kabaddi 11Sakal
Updated on

Pro Kabaddi League Season 11 auction: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचा लिलाव गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईत होत आहे. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागलेली दिसली, तर काही खेळाडूंवर लाखोंची बोली लागली.

महाराष्ट्रातील खेळाडूंवरही मोठी बोली लागली आहे. यामध्ये आता शुभम शिंदेचाही समावेश झाला आहे. डिफेंडर असलेल्या शुभम शिंदेवर पटना पायरेट्स या प्रो कबड्डीमधील यशस्वी संघाने ७० लाखांची बोली लावली आहे. त्यामुळे आता आगामी हंगामात चिपळुणचा असलेला शुभम पटनाकडून खेळताना दिसणार आहे.

राईट कॉर्नर ही शुभमची ताकद आहे. त्यामुळे पटनाला त्याच्याकडून आता मोठ्या अपेक्षा असतील. २४ वर्षीय शुभम दुसऱ्यांदा पटना संघात गेला आहे. यापूर्वी २०२१ साली आठव्या हंगामात तो पटनाकडून १९ सामने खेळला होता, ज्यात त्याने १८ पाँइंट्स मिळवले होते.

Shubham Shinde | Pro Kabaddi 11
Pro Kabaddi Auction 2024: सचिनने 'भाव' खाल्ला! प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसरा महागडा खेळाडू ठरला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.