Pro Kabaddi Auction 2024: कोकणचा 'अजिंक्य'! पवारांच्या लेकाला कोट्यवधीची लॉटरी, U Mumba वर राज्याबाहेरील संघाची कुरघोडी

PKL Auction 2024: महाराष्ट्राच्या स्टार कबड्डीपटू सिद्धार्थ देसाईवर २६ लाखांचीच बोली लागली असताना रत्नागिरीच्या लेकासाठी कोटींची बोली लागली गेली.
Ajinkya Pawar Kabaddi
Ajinkya Pawar Kabaddiesakal
Updated on

Pro Kabaddi Auction 2024 Ajinkya Pawar: प्रो कबड्डी लीग २०२४ च्या लिलावात महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईसाठी फक्त २६ लाख मोजले गेले असताना रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने कोटींची झेप घेतली. अजिंक्यसाठी बरेच संघ प्रयत्नशील होते आणि २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी त्यांनी पाच पट बोली लावलीही, परंतु राज्याबाहेरील संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

बंगळुरू बुल्सने अजिंक्यवर पहिली बोली लावली, परंतु तेलगू टायटन्सने ३० लाखांची बोली लावून शर्यतीत उडी घेतली. त्यानंतर यूपी योद्धा आणि जयपूर पिंक पँथर्स हेही शर्यतीत आहे. बंगळुरूने ६९.७५ लाखांची बोली लावताच जयपूरने ७० लाख म्हटले. अजिंक्यची किंमत ८६.२५ लाखांपर्यंत गेल्यावर बंगळुरूला याच किमतीत तो आपल्याकडे येईल असे वाटले होते, परंतु यू मुंबाची एन्ट्री झाली. दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली आणि अखेर बंगळुरूने १.१० कोटींत अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेतले.

रत्नागिरीचा अजिंक्य...

१९ फेब्रुवारी १९९७ मध्ये रत्नागिरीत जन्मलेला अजिंक्य प्रो कबड्डी लीगमध्ये येण्यापूर्वी महिंद्रा आणि महिंद्र संघाकडून खेळत होता. त्याने प्रो कबड्डी सीझन ६ मध्ये जयपूर पिंक पँथर्स सोबत पदार्पण केले होते. जयपूर पिंक पँथर्ससाठी खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये त्याने ७५ गुण मिळवले आणि एकाच सामन्यात ९ ही त्याची सर्वाधिक गुणसंख्या होती.

उल्लेखनीय चढाई कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यला प्रो कबड्डी सीझन ७ साठी जयपूर पिंक पँथर्सने कायम ठेवले होते. सीझन ८मध्ये तो १९.५० लाखांत तमिळ थलायव्हाजकडे गेला आणि पुढील पर्वात त्यांनी त्याला ३३ लाखांत कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.