Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगमासाठी 'या' दिवशी होणार लिलाव

Pro Kabaddi League Auction
Pro Kabaddi League Auction esakal
Updated on

Pro Kabaddi League Auction : प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी 2023 च्या हंगमासाठीच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. हा लिलाव 8 आणि 9 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. जगातील सर्वात्तम आणि सर्वात मोठी कबड्डी लीग यंदा आपला 10 वा हंगाम साजरा करणार आहे.

प्रो कबड्डी लीग लिलावात प्रत्येक फ्रेंचायजींची पर्स ही तीन लीगनंतर 4.4 कोटीवरून 5 कोटी रूपये वाढवून देण्यात आली होती. लिलावासाठी भारताच्या आणि परदेशी खेळाडूंची अ, ब, क, ड अशा चार श्रेणीत विभागणी केली आहे. खेळाडू हे अष्टपैलू, बचावपटू, रेडर अशी उपविभागणी देखील करण्यात आली आहे.

Pro Kabaddi League Auction
Usman Khawaja MCC Controversy : उस्मान ख्वाजाला भिडले; MCC ने थेट 3 सभासदांना केलं निलंबित; वाचा नेमकं काय घडलं?

प्रत्येक श्रेणीची बेस प्राईस पुढील प्रमाणे

अ - 30 लाख

ब - 20 लाख

क - 13 लाख

ड - 9 लाख

प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामाच्या लिलावात जवळपास 500 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. यात 24 खेळाडू हे खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स 2023 मधील अंतिम फेरीतील दोन संघातील असतील.

Pro Kabaddi League Auction
Asia Cup 2023 : आशिया कपच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

मशाल स्पोर्ट्स आणि लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले की, 'भारतातील कोणत्याही खेळाच्या लीगचा 10 वा हंगाम हा मोठा मैलाचा दगड असतो. प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामाचा लिलाव देखील इतिहासात एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. 10 व्या हंगामाच्या लिलावात रिटेंशन आणि नॉमिनेशनसह 12 फ्रेंचायजी जगातील सर्वोत्तम कबड्डीपटू त्यांच्या संघासाठी निवडतील.'

प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामासाठीच्या लिलावापूर्वी संघ 9 व्या हंगामातील आपल्या खेळाडूंना रिटेन करू शकतात. फ्रेंचायजी जास्तीजास्त 6 खेळाडू रिटेन करू शकतात. जे रिटेन होणार नाहीत ते खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.