Pro Kabaddi Auction 2024: ऐकेकाळी १.४५ कोटी घेणारा महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई काही लाखांत गेला...

PKL Auction 2024 Siddharth Desai: राजस्थानचा २५ वर्षीय सचिन तनवर हा यंदाच्या लिलावात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे आणि प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम घेणारा तो दुसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला.
Siddharth Desai  Kabaddi
Siddharth Desai Kabaddiesakal
Updated on

Pro Kabaddi Auction 2024 Siddharth Desai: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पदार्पण अन् पुढच्याच पर्वात सर्वाधिक रक्कम घेतलेल्या सिद्धार्थ देसाईचा कारकीर्दिचा ग्राफ उतरता राहिला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या PKL Auction मध्ये ऐकेकाळी कोट्यवधी घेणाऱ्या सिद्धार्थवर काही लाखांचीच बोली लागलेली पाहायला मिळाली. २० लाखांच्या मुळ किंमतीपासून तो काही लाखच पुढे जाऊ शकला...

प्रो कबड्डी लीग २०२४ चा लिलाव मुंबईत पार पडत आहे आणि यात खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतलेली पाहायला मिळत आहेत. तमिळ थलायव्हाजने सचिन तनवरसाठी २.१५ कोटी रुपये मोजले. त्यानंतर इराणचा अष्टपैलू मोहम्मद्रेझा ( २.०७ कोटी) प्रो कबड्डीच्या १०व्या पर्वात सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्यानंतर गुमान सिंगला १.९७ कोटींत गुजरात जायट्सने, पवन सेहरावतला १.७२ कोटींत तेलगू टायटन्सने आणि भरतला १.३० कोटींत यूपी योद्धाने खरेदी केले.

PKS Season 11 च्या लिलावात ५००हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये एक संघ कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

महाराष्ट्राचा खेळाडू....

महाराष्ट्रात जन्मलेल्या सिद्धार्थला प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात यू मुंबाने ३६.४० लाख रुपये मोजून संधी दिली. त्यानंतर तेलगू टायटन्सने सलग तीन पर्व त्याच्यासाठी १.४५ कोटी, १.३० कोटी आणि २० लाख अशी रक्कम मोजली.

सिद्धार्थला कबड्डीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले. त्याचे वडील आणि भाऊ सूरज दोघेही कबड्डीपटू होते. सिद्धार्थने त्याचे पालक आणि भावाच्या मार्गदर्शनाने व पाठिंब्याने शिक्षणाला प्राधान्य दिले. विज्ञान विषयात बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने भौतिकशास्त्रात बीएससी पदवी घेतली आहे.

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हुंडलेवाडीतील सिद्धार्थला कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि PKL 11 च्या लिलावात दिल्ली, बंगाल व मुंबई या फ्रँचायझीने त्याच्यासाठी रस दाखवला. पण, २६ लाखांपर्यंत सारेच थांबले अन् दबंग दिल्लीने त्याला आपलेसे केले. सिद्धार्थ प्रमाणे अनेक स्टार खेळाडू यावेळी कमी किमतीत गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.