Pro Kabaddi Auction 2024 : ५ वर्षांनंतर Jang Kun Lee आला! सर्वाधिक जेतेपद जिंकलेल्या संघात दाखल झाला

PKL Auction 2024: प्रो कबड्डी लीगच्या आगामी पर्वासाठी सुरू असलेल्या लिलावाचा आज दुसरा दिवस आणि सर्वांचा आवडता Jang Kun Lee याच्या पुनरागमनाने चाहते आनंदीत झाले आहेत.
Jang ku Lee PKL Auction
Jang ku lee PKL auctionesakal
Updated on

Pro Kabaddi League Auction 2024 Jang Kun Lee Live : प्रो कबड्डी लीग २०२४ च्या लिलावात पहिल्या दिवशी ८ खेळाडूंवर कोटींची बोली लागली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच ८ खेळाडू कोट्यधीश झाले आणि दुसऱ्या दिवशी कोण महागडा ठरतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, आज सर्वांचे लक्ष वेधले ते जँग कून ली याने.. २०१९ नंतर प्रथमच स्टार खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये परतला आहे आणि तो आता सर्वाधिक जेतेपद जिंकणाऱ्या संघाकडून खेळणार आहे.

लिलावाच्या पहिल्या दिवशी सचिन तनवरने सर्वाधिक २.१५ कोटींची किंमत घेतली आणि तो तमिळ थलायव्हाजकडून खेळणार आहे. इराणचा मोहम्मद्रेझा चियानेह ( २.०७ कोटी), गुमान सिंग ( १.९७ कोटी), पवन सेहरावत ( १.७२५ कोटी) आणि भरत ( १.३० कोटी) हे महागडे खेळाडू ठरले. चढाईपटूंमध्ये मनिंदर सिंग ( १.१५ कोटी), अजिंक्य पवार ( १.१०७ कोटी) व मनजीत ( ८० लाख) यांनीही मोठी रक्कम घेतली.

Jang ku Lee PKL Auction
Pro Kabaddi Auction 2024: सचिनने 'भाव' खाल्ला! प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसरा महागडा खेळाडू ठरला

दक्षिण कोरियाचा स्टार आला..

दक्षिण कोरियाचा माजी व्यावसायिक कबड्डीपटू कून ली हा प्रो कबड्डी लीगमध्ये चढाईत ४०० गुण घेणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला होता. बंगाल वॉरियर्सने त्याला रिटेन ठेवल्यानंतर तो most valuable international खेळाडू ठरला होता. सहाव्या पर्वातही तो बंगालकडून खेळला. त्यानंतर तो पाटना पायरट्सकडून खेळला आणि प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात सर्वात यशस्वी परदेशी चढाईपटू म्हणून मैदान गाजवले.

२०१९नंतर तो येतोय...

दक्षिण कोरियाचा स्टार कबड्डीपटू २०१९नंतर प्रो कबड्डी लीगमध्ये आला आहे आणि तीन वेळच्या विजेत्या पाटना पायरट्सने त्याला १७.५० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले. पाटनाने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या पर्वात बाजी मारून जेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली होती.

परदेशी चढाईपटूंना भाव नाही...

अकिकाझू इजून, ज्यून जिए ली, मोबीन नाझरी, वू फू कई जिन, चायाफोन कामुनी आणि पिओट्र पामुलाक हे परदेशी चढाईपटू अनसोल्ड राहिले.

Jang ku Lee PKL Auction
Pro Kabaddi Auction 2024: कोकणचा 'अजिंक्य'! पवारांच्या लेकाला कोट्यवधीची लॉटरी, U Mumba वर राज्याबाहेरील संघाची कुरघोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.