Pro Kabaddi Naveen Kumar : दबंग दिल्लीला मोठा धक्का कर्णधारच लीगमधून बाहेर

Pro Kabaddi Naveen Kumar
Pro Kabaddi Naveen Kumaresakal
Updated on

Pro Kabaddi Naveen Kumar : प्रो कबड्डी लीगच्या 20 व्या हंगामात दबंग दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि अव्वल रेडर रवीन कुमार हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्याला मुकणार आहे. पीकेएल फ्रेंचायजीने आज याबाबतची माहिती दिली. नवीन कुमारला जयपूर पँथर विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो.

Pro Kabaddi Naveen Kumar
Ind vs Afg 1st T20I : शिवम दुबेची तडाखेबाज फलंदाजी, भारताने पहिला सामना घातला खिशात

पीकेएल फ्रेंचायजीने एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं, 'जयपूरविरूद्ध 27 डिसेंबरला झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीच्या नवीन कुमारला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता प्रो कबड्डीचा उर्वरित हंगामातील सामने खेळणार नाहीये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दबंग दिल्लीचे संघ व्यवस्थापन त्याच्यावरील उपचार आणि शस्त्रक्रिया याच्यावर लक्ष ठेवून आहे.'

नवीनसाठी हा हंगाम चांगला गेला आहे. तो प्रो कपड्डी लीगच्या इतिहासात सर्वात वेगाने 1000 रेड पॉईंट्स मिळवणारा खेळाडू ठरला आहे. दबंग दिल्लीचे सीईओ दुर्गानाथ वागळे म्हणाले की, 'नवीन हा एक प्रमुख लीडर आहे. दबंग दिल्लीच्या यशामागचं प्रमुख कारण देखील नवीन कुमारच आहे. त्याची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे. त्याच्या कठिण काळात त्याच्या मागे आम्ही उभे आहोत.

Pro Kabaddi Naveen Kumar
IND vs AUS T20 : रोहित - विराटला टी 20 संघात घेणं म्हणजे रिव्हर्स गिअर; काय म्हणतोय सुरेश रैना?

ते पुढे म्हणाले की, नवीनचे नेतृत्व आणि कामगिरी आमच्यासाठी महत्वाची राहिली आहे. त्याच्या रिहॅबिलिटेशनसाठी लागणारी सर्व मदत आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

नवीनच्या अनुपस्थितीत आशू मलिक उर्वरित हंगामात दबंग दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. सध्या संघ चार विजयासह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.