PKL 2021 : पुणेरी पलटनचा फ्लॉप शो; पटना पिछाडीवरुन जिंकलं

PKL 2021
PKL 2021Sakal
Updated on

प्रो कबड्डी लीग (PKL) च्या आठव्या हंगामातील 23 व्या सामन्यात तमिल थलायवाजनं पुणेरी पलटनला पराभूत केले. यंदाच्या हंगामात तमिल थलायवाजचा हा पहिला विजय असून पुणेरी पलटन अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. दुसऱ्या एका सामन्यात पटना पायरेट्सनं बंगाल वॉरियर्सला पराभूत करत हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. (pro kabaddi league Day 9 Tamil Thalaivas vs Puneri Paltan and Patna Pirates vs Bengal Warriors)

तमिळ थलायवाजने (Tamil Thalaivas) पुणेरी पलटनला (Puneri Paltan) 36-26 असे पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच तमिळ थलायवाजनं पुणेरी पलटनला दबावात टाकले. तमिल थलायवाजचा कर्णधार सुरजीतनं डिफेन्समध्ये दमदार कामगिरी केली. पहिल्या हाफच्या खेळानंतर तमिळ थलायवाजनं 18-11 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटनचा स्टार खेळाडू राहुलला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी तमिल थलायवाज 36-26 अशी मात दिली.

PKL 2021
धवनला घेतलं खरं; पण...ऋतूराज-अय्यर असताना द्रविड त्याला संधी देईल?

अजिंक्य पवारचा सुपर 10 शो

तमिळचा रेडर अजिंक्य पवारने या सामन्यात सुपर 10 पूर्ण केले. त्याने सामन्यात 11 गुण कमावले. दुसऱ्या बाजूला मंजितने 8 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटनच्या पंकज मोहितेनं सात रेड पॉइंट्स मिळवले. त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. परिणामी पुण्याला पराभवाचा सामना करावा लागला.

PKL 2021
SA VS IND : रोहित आउट; KL राहुल बनला कॅप्टन; असा आहे वनडे संघ

पटनानं बंगालला 44-30 ने नमवलं

बंगालचा (Bengal Warriors) स्टार रेडर मनिंदर सिंहने सुरुवातीपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या हाफमध्येच त्याने सुपर 10 ला गवसणी घातील. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर बंगालने 21-16 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये डाव पलटला. मोनूला सचिन तवंरनं उत्तम साथ दिली. या दोघांच्या कामगिरीच्या जारावर पिछाडी भरुन काढत पटनाने (Patna Pirates) 44-30 असा विजय नोंदवला.

मोनू गोयत आणि मनिंदरची सुपर-10 कामगिरी

पटनाकडून मोनू गोयतने सर्वाधिक 12 गुणांची कमाई केली. यासह त्याने प्रो कबड्डीमध्ये 500 पॉइंट्सचा टप्पा पार केलाय. सचिन तवंरनं 9 गुणांची कमाई केली. दुसऱ्या बाजूला मनिंदरने सुपर टेनसह 12 गुण मिळवले. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.