Pro Kabaddi League Season 11 Starts on October 18th: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचा लिलाव ऑगस्टमध्ये मुंबईत पार पडला. या लिलावात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मोठी किंमत मोजल्याचे दिसले. एकूण आठ खेळाडूंना एक कोटीहून जास्त रक्कम मिळाली. हा प्रो कबड्डीच्या लिलावातील एक नवा विक्रमही ठरला. आता यंदाच्या हंगामाच्या तारखा आणि ठिकाणांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे.
प्रो कबड्डीचा यंदाचा मोसम १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी ही स्पर्धेतील सामने केवळ तीन ठिकाणी होणार आहेत. हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ही तीन ठिकाणे यंदाच्या हंगामातील सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.