U Mumba won Against UP Yoddha: प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात सर्वोत्तम राखीव खेळाडू (सुपर सब) म्हणून नावारुपाला आलेल्या रोहित राघवने नोएडातील पहिल्या सामन्यात आपला लौकिक कायम राखला. निर्णायक क्षणी रोहित राघवने मिळविलेल्या तीन गुणांच्या जोरावर यू-मुंबाने रविवारी झालेल्या सामन्यात यूपी योद्धाजचा प्रतिकार ३५-३३ असा मोडून काढला. रोहितचे आठ गुण आणि कर्णधार सुनीलकुमारचे बचावातील ४ गुण यू- मुंबासाठी निर्णायक ठरले. यू- मुंबाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली हे विशेष.