PKL 11 Schedule: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पुण्यात कधी, कोणात रंगणार लढती

PRO KABADDI LEAGUE SEASON 11 SCHEDULE : प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या पर्वाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. हैरदाबाद, नोएडा आणि पुणे या तीन शहरांमध्ये PKL 11 चे सामने खेळवण्यात येणार आहेत.
pro kabaddi
pro kabaddiesakal
Updated on

PRO KABADDI LEAGUE SEASON 11 SCHEDULE ANNOUNCED :

प्रो कबड्डी लीग २०२४-२५ चे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. प्रो कबड्डीचा यंदाचा मोसम १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील सामने हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे या तीन शहरांमध्ये खेळवण्यात येतील. १८ ऑक्टोबरला पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात होईल. याच दिवशी यू मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात दुसरा सामना होईल. हैदराबाद टप्पा हा १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर असा असेल, तर नोएडा येथे १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर आणि पुणे येथे ३ ते २४ डिसेंबर असे टप्पे पार पडतील. प्ले ऑफ, उपांत्य फेरी आणि फायनल्सचे स्थळ नंतर ठरवले जाणार आहेत.

स्पर्धेचं वेळापत्रक

पुणे लेग

०३ डिसेंबर - बंगळुरू बुल्स वि. गुजराज जायंट्स ( रात्री ८ वा.) व यू मुंबा वि. पुणेरी पलटन ( रात्री ९ वा.)

०४ डिसेंबर - तेलुगू टायटन्स वि. यूपी योद्धा ( रात्री ८ वा.) व हरयाणा स्टीलर्स वि. बंगाल वॉरियर्स ( रात्री ९ वा.)

०५ डिसेंबर - दबंग दिल्ली के.सी वि. यूपी योद्धाज ( रात्री ८ वा.) व जयपूर पिंक पँथर्स वि. यू मुंबा ( रात्री ९ वा.)

०६ डिसेंबर - हरयाणा स्टीलर्स वि. पाटणा पायरेट्स ( रात्री ८ वा.) व तमिळ थलायव्हाज वि. गुजरात जायंट्स ( रात्री ९ वा.)

०७ डिसेंबर - यूपी योद्धाज वि. पुणेरी पलटन ( रात्री ८ वा.) व तेलुगू टायटन्स वि. बंगाल वॉरियर्स ( रात्री ९ वा.)

Pro Kabaddi League Season 11
Pro Kabaddi League Season 11 esakal
Pro Kabaddi League Season 11
Pro Kabaddi League Season 11 esakal

गेल्या अनेक हंगामांप्रमाणे ११ व्या हंगामातील सामन्यांचेही थेट प्रशिक्षप स्टार स्पोर्ट्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे.

प्रो कबड्डीचे आत्तापर्यंतचे विजेते

  • पहिला हंगाम - जयपूर पिंक पँथर्स

  • दुसरा हंगाम - यू मुम्बा

  • तिसरा हंगाम - पाटना पायरेट्स

  • चौथा हंगाम - पाटना पायरेट्स

  • पाचवा हंगाम - पाटना पायरेट्स

  • सहावा हंगाम - बंगळुरू बुल्स

  • सातवा हंगाम - बंगाल वॉरियर्स

  • आठवा हंगाम - दबंग दिल्ली केसी

  • नववा हंगाम - जयपूर पिंक पँथर्स

  • दहावा हंगाम - पुणेरी पलटण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.