Pro Kabaddi League Season 8: प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) पटना पायरेट्स (Patna Pirates) विरुद्धच्या सामन्याने आपल्या यंदाच्या हंगामाला सुरुवात करेल. संघाची मदार विकास खंडोला (Vikash Khandola) याच्या खांद्यावर असून धर्मराज चेरालाथन (Dharmraj Cheralathan), नवीन कुमार (Navin Kumar) आणि विकास काले हे चांगल्या दमाचे खेळाडू हरियणात आहेत. या तगड्या गड्यांनी बरलेल्या संघाला सामन्यापूर्वी खास प्रेरणादायी संदेश आला आहे. ओलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ने संघाला प्रोत्साहन देण्यासाठी खास संदेश पाठवलाय.
हरियाणा स्टीर्लसने आतापर्यंत तीन हंगामात स्पर्धेत भाग घेतला असून दोन वेळा संघ प्लेऑफ्समध्ये पात्र ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्यांच्यासोबत नीरज चोप्राही आहे. त्याच्या प्रोत्सानामुळे संघाला निश्चितच फायदा होईल. यंदाच्या वर्षी जपानमधील टोकियोत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo 2020 Olympics) भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली होती.
भारताच्या गोल्डन बॉयने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने हरियाणा स्टीलर्सला पाठिंबा व्यक्त केलाय. “ या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय की, मी हरियाणा टीमसोबत आहे. टीम धाकड असून विकास भाई आणि राकेश कोणत्याही संघाविरुद्ध पंगा घेण्यास सज्ज आहेत. यंदाच्या हंगामासाठी संघाला खूप खूप शुभेच्छा! ऑलिम्पिक चॅम्पियनचा हा संदेश हरियाणा स्टीलर्ससाठी नवा जोश देणारा असा आहे.
हरियाणाच्या संघानं पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात 23-23 सामने खेळले होते. यात त्यांना प्रत्येकी 13-13 सामन्यात विजय मिळाला होता. दुसऱ्या हंगामात त्यांना म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र पटना विरुद्धचे त्यांचे रेकॉर्ड चांगले आहे. आतापर्यंत पटना विरुद्ध 5 पैकी 3 सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे. नीरजच्या शुभेच्छा घेऊन मॅटवर उतरणाऱ्या हरियाणा सलामीच्या सामन्यात कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बेंगळुरुच्या शेराटॉन ग्रँड व्हाइटफील्डमध्ये तिसरा सामना हा हरियणा आणि पटना यांच्यात रंगणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.