Berlin Marathon : बर्लिन मॅरेथॉनमध्ये झळकले चार पुणेकर

जर्मनीतील बर्लिन मॅरेथॉनमध्ये यंदा ४७ हजार ९१२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
pune runner
pune runner sakal
Updated on

पुणे -जगातील प्रमुख सहा मॅरेथॉनपैकी एक असलेल्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये पुण्यातील चार धावपटू झळकले. साहिल शहा, संदीप बंब, रवी कदम आणि आरती भांडावले यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली.

जर्मनीतील बर्लिन मॅरेथॉनमध्ये यंदा ४७ हजार ९१२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जगातील वेगवेगळ्या देशांच्या स्पर्धकांचा समावेश होता. या मॅरेथॉनमध्ये पुण्यातील फिटनेस फर्स्ट इंडिया या संस्थेच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन ती पूर्ण केली. ही स्पर्धा ४२.१९८ किलोमीटरची होती. यामध्ये फिटनेस फर्स्ट इंडियाचे साहिल शहा यांनी ३० वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन चार तास १७ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.

संदीप बंब यांनी ५० वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन चार तास ५६ मिनीटे, रवी कदम यांनी ५५ वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन ६ तास ६ मिनीटे या वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. आरती भांडावले यांनी ४० वर्षांवरील वयोगटात भाग घेत चार तास ३९ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.

pune runner
Adivasi Krida Prabodhini : क्रीडा प्रबोधिनीत 7 नव्या खेळांचा समावेश; आदिवासी खेळाडूंना सुवर्णसंधी!

या स्पर्धेसाठी चौघांनी चार महिने अगोदरपासूनच तयारी सुरू केली होती. प्रशिक्षक विजय गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी रोज होणारे प्रशिक्षण त्याचबरोबर आहार, गरजेची विश्रांती याची काळजी त्यांनी घेतली.d

pune runner
J&K Anantnag Encounter: अनंतनागमध्ये चार दिवसांपासून गोळीबार सुरुच; आणखी एक जवान शहीद

विजय गायकवाड म्हणाले, ‘‘बर्लिन मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे त्यासाठी पुण्यासाठी मोठी उपलब्धी आहे. कोणतीही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे त्यासाठी धावणे आणि स्नायू मजबूत करणे गरजेचे असते. ते सगळे कष्ट या धावपटूंनी घेतले. त्यामुळेच ते जर्मनीत यशस्वी होऊ शकले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.