BWF World Tour Finals : भारतासाठी सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सिंधूने वर्षांअखेरच्या प्रतिष्ठेत स्पर्धेत विजयी सलामी दिलीये. 'बीडब्ल्यूएफ' जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूसह श्रीकांतने पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. महिला एकेरीत ऑलिम्पिक स्टार पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसेन ला 21-14, 21-16 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे पुरुष एकेरीतील ब गटात श्रीकांतने फ्रान्सच्या टोमा ज्यूनियर पोपोव याचा खेळ 42 मिनिटांत खल्लास केला. त्याने हा सामना 21-14, 21-16 असा सरळ सेटमध्ये खिशात घातला. 2018 मध्ये पीव्ही सिंधूने ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू एकमेव भारतीय शटलर आहे. या स्पर्धत विजयी सलामी देत तिने पुन्हा एकदा स्पर्धा गाजवण्याचे संकेत दिले आहेत.
कही खुशी कही गम....
पुरुष आणि महिला ऐकेरीत भारताने दमदार सुरुवात केली असली तरी महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीने निराश केले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या नामी मत्सुयामा आणि चिहारू शिडा जोडीने 21-14, 21-18 अशी मात दिली.
पुरुष ऐकेरीत श्रीकांतने जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या खेळाडूला पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केलीये. पहिल्या सेटमध्ये दोघांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण ब्रेकपर्यंत श्रीकांतने 11-9 अशी आघाडी घेत सामना आपल्या बाजून वळवला. त्यानंतर सलग 5 पॉइंटसह त्याने आघाडी भक्कम केली आणि सरशेवटी सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांत 1-4 पिछाडीवर होता. यातून कमबॅक करत श्रीकांतने दुसऱ्या सेटसह सामना एकहाती जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.