Japan Open 2023 : सिंधू, प्रणोय आतातरी अपयशातून बाहेर येणार?

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही सात्त्विक-चिरागला विजेतेपदाची संधी
pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourney
pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourneysakal
Updated on

टोकियो : दोन ऑलिंपिक पदके मिळवणारी पी.व्ही. सिंधू तसेच एस. एस प्रणोय यांच्या समोर पुन्हा एकदा अपयशांची मालिका खंडित करण्याचे आव्हान असणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत एकीकडे सिंधू, प्रणोयसमोर आव्हानांचा डोंगर असताना दुसरीकडे कोरियन ओपन जिंकणारे सात्विकराज आणि चिराग शेट्टी यशाची कमान आणखी उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गतवर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सात्त्विक आणि चिराग यांनी रविवारी झालेल्या कोरियन ओपनच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फजार अल्फियन आणि महम्मद रियान यांचा पराभव केला आणि सलग दहा सामने जिंकण्याची मालिका कायम राखली.

जपान ओपनमध्ये त्यांना तिसरे मानांकन असून त्यांचा सलामीला सामना लिओ रॉली कार्नांडो व डॅनियन मार्टिन या इंडोनेशिया खेळाडूंविरुद्ध होणार आहे.पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस जवळपास एक वर्ष शिल्लक असताना पी.व्ही. सिंधूचा हरपलेला फॉर्म चिंता वाढवणारा आहे.

pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourney
World Badminton : पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणॉय नवव्या स्थानावर

दोन ऑलिंपिकपदके आणि जागतिक विजेतेपद असा लौकिक मिळवणाऱ्या सिंधूला दुखापतींचाही त्रास सहन करावा लागलेला आहे. आता तर जागतिक क्रमवारीत तिचे मानांकन १७ पर्यंत घसरले आहे. या वर्षातील १२ वर्ल्ड टूर स्पर्धांत तर सिंधू सहा वेळा पहिल्याच फेरीत गारद झाली आहे.

गेल्या आठवड्यातील कोरियन ओपन स्पर्धेत सिंधूला तिच्यापेक्षा किती तरी कमी मानांकन असलेल्या पाय यु पो या खेळाडूकडून पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. आपल्या खेळात सुधारणा आणि प्रगती होण्यासाठी सिंधूने २००३ मधील ऑल इंग्लंड विजेत्या महम्मद हफिझ हशीम यांची वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourney
Japan Rain : जपानमध्ये पावसाचं थैमान! ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन, २० नद्यांना महापूर

सिंधूची मानसिकता कमकुवत झाली आहेत त्यामुळे तिच्याकडून चुका अधिक प्रमाणात होत आहेत. जपान ओपनमध्ये तिचा सलामीचा सामना मलेशियाच्या झँग यी मान हिच्याविरुद्ध होणार आहे.

मे महिन्यात झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेत झँगचा पराभव करून सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने पहिल्या फेरीत हा अडथळा पार केला तरी पुढच्या फेरीत तिचा सामना ताय झु यिंग हिच्याविरुद्ध होण्याची शक्यता आहे. ताय ही खेळाडू सिंधूला नेहमीच भारी ठरलेली आहे. तिच्याविरुद्ध तब्बल १९ लढती सिंधूने गमावलेल्या आहेत.

pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourney
PV Sindhu : पी.व्ही. सिंधू, प्रणोयची आजपासून कसोटी

तर प्रणोय-श्रीकांत आमनेसामने

पुरुषांच्या एकेरीत प्रणोयवर भारताची मदार असेल. परंतु त्याचाही सूर हरपलेला आहे. मे महिन्यातील मलेशियन मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर त्याने अपेक्षा उंचावल्या होता, परंतु गत आठवड्यातील कोरिया ओपनमध्ये त्याचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले होते.

उद्याच्या सलामीच्या सामन्यात त्याचा सामना बिगर मानांकित चीनच्या ली शी फेंगविरुद्ध होणार आहे. तर किदांबी श्रीकांतचा प्रतिस्पर्धी तैपेईचा चोऊ तियन चेन असणार आहे. पहिल्या फेरीचे अडथळे प्रणोय आणि श्रीकांत यांनी पार केले तर दुसऱ्या फेरीत ते एकेमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. त्यामुळे एका भारतीयाचे मजल फार फार तर दुसऱ्या फेरीपर्यंत असणार आहे.

pv sindhu hs prannoy keen to regain lost touch at japan open super 750 tourney
Pune Crime News : सिंहगड रस्त्यावर हॉटेलची तोडफोड, लूटमार; कारवाईसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही मारहाण

लक्ष्य सेनचे पुनरागमन

भारताचा एकेरीतील हुकमी खेळाडू लक्ष्य सेन या जपान ओपन स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे. कॅनडा ओपन जिंकल्यानंतर त्याने कोरिया स्पर्धेतून विश्रांती घेतली होती. आता जपान ओपन स्पर्धेत लक्ष्य आणि प्रियांशू राजावत या दोन भारतीयांमध्येच सलामीचा सामना होणार आहे. लक्ष्यने हा सामना जिंकला तर दुसऱ्या फेरीत त्याला दुसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटिंग याच्याशी सामना करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.