India Vs Qatar : FIFA World Cupच्या क्वालिफायरमध्ये झाली चीटिंग? वादग्रस्त गोलमुळे टीम इंडियाचा पराभव

India Vs Qatar : सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारताचा फुटबॉल संघ मंगळवारी इतिहास रचण्यापासून थोडक्यासाठी दूर राहिला.
Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
Qatar vs India FIFA World Cup Qualifierssakal
Updated on

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers : सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारताचा फुटबॉल संघ मंगळवारी इतिहास रचण्यापासून थोडक्यासाठी दूर राहिला. ७३व्या मिनिटाला कतारकडून बरोबरीचा गोल करण्यात आला; पण हा गोल वादग्रस्त ठरला. रेफ्रींकडून हा गोल ग्राह्य धरण्यात आला.

अखेर ७२व्या मिनिटांपर्यंत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला २-१ असे पराभूत व्हावे लागले. फिफा विश्‍वकरंडकाच्या (एफसी) पात्रता फेरीत अ गटामध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे तिसऱ्या फेरीपासून भारतीय संघाला दूरच राहावे लागले.

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
IND vs USA : शिवम दुबे OUT, 'या' खेळाडूला मिळणार संधी... अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित करणार मोठा बदल?

कतारचा संघ फिफा क्रमवारीत ३४व्या स्थानावर आहे. तसेच भारतीय संघ १२१व्या स्थानावर आहे. त्यामुळे या लढतीत कतारचेच वर्चस्व दिसून येईल, असे वाटत होते. मात्र, ३७व्या मिनिटाला एल. छांगटे याने दमदार गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने ही आघाडी ७२व्या मिनिटांपर्यंत कायम ठेवली. ७३व्या मिनिटाला एक विवादास्पद घटना घडली.

कतारच्या फ्री कीकवर भारताचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने छान कामगिरी केली. त्याने फुटबॉल अडवला. तसेच तो रेषेबाहेरही गेला. त्यानंतर अल हसन याने तो फुटबॉल आत घेतला व युसूफ येमेन याने गोल केला. या लढतीत ‘व्हीएआर’ हे तंत्रज्ञान नसल्यामुळे रेफ्रींनी सहाय्यकांना या गोलबाबत विचारले आणि गोलला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानंतर अहमद रावीने ८५व्या मिनिटाला दुसरा गोल केला व कतारचा विजय निश्‍चित झाला.

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
Australia vs Namibia : ऑस्ट्रेलियाला ‘सुपर आठ’ फेरीचा ध्यास; ब गटातील लढतीत आज नामिबियाशी लढणार

अफगाणची हार

कुवेतने याच गटातील अन्य लढतीत अफगाणिस्तानचा १-० असा पराभव केला व पुढल्या फेरीत प्रवेश केला. अल रशिदी याने ८१व्या मिनिटाला गोल करीत कुवेतसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली. कतारने १६ गुणांसह व कुवेतने सात गुणांसह आगेकूच केली. भारताला पाच गुणांवरच समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.