Quota of the Paris Olympics: भारतीय तिरंदाजांनी मिळवला ऑलिंपिक कोटा;पुरुष व महिला सांघिक विभागात पॅरिसचे तिकीट

भारतीय तिरंदाजांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवता आला आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागातील सांघिक प्रकारात पॅरिसचे तिकीट बुक करता आले आहे.
Quota of the Paris Olympics
Quota of the Paris Olympics sakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय तिरंदाजांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवता आला आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागातील सांघिक प्रकारात पॅरिसचे तिकीट बुक करता आले आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेकडून ताजी क्रमवारी सोमवारी अपडेट करण्यात आली. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात भारत पहिल्या स्थानावर विराजमान असल्यामुळे भारतीय तिरंदाजांना ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येणार आहे.

भारताला पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात ऑलिंपिक कोटा मिळाल्याचा फायदा पुढे होण्याची शक्यता आहे. भारतीय तिरंदाज आता पॅरिस ऑलिंपिकमधील पाचही विभागात आपले कौशल्य आजमावणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिरंदाजी या खेळामध्ये पाच प्रकारात खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहेत. पुरुष सांघिक, महिला सांघिक, पुरुष वैयक्तिक, महिला वैयक्तिक व मिश्र अशा पाचही विभागात भारतीय तिरंदाजांना पदक जिंकण्याची संधी असणार आहे.

दीपिका, तरुणचे चौथे ऑलिंपिक

महिला विभागात दीपिकाकुमारी व पुरुष विभागात तरुणदीप राय यांची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. दोघांचेही हे चौथे ऑलिंपिक असणार आहे. तरुणदीप याने २००४ मधील अथेन्समध्ये पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा अनुभव मिळवला होता. दीपिकाकुमारी सलग चौथ्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. महाराष्ट्राचा प्रवीण जाधव सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये खेळणार आहे. धीरज बोम्मादेवरा, अंकिता भकत व भजन कौर हे तीनही तिरंदाज पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होतील.

भारतीय तिरंदाजी संघ

  • पुरुष - तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव

  • महिला - दीपिकाकुमारी, भजन कौर, अंकिता भकत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.