R Ashwin Video : अश्विनने मैदानात घातला राडा, पंचांच्या रिव्ह्यूवर घेतला रिव्ह्यू, व्हिडिओ झाला व्हायरल

R Ashwin Video
R Ashwin Video
Updated on

R Ashwin Video : भारतीय फिरकीपटू आर अश्विन सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये बेंचवर बसल्यानंतर अश्विन टीएनपीएल 2023 मध्ये त्याच्या जुन्या लय मध्ये दिसत आहे.

डिंडीगुल ड्रॅगन्स आणि त्रिची यांच्यात झालेल्या सामन्यात अश्विनने 2 विकेट घेतले. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्विन अंपायरशी वाद घालताना दिसत आहे.

R Ashwin Video
Wriddhiman Saha : मॅच खेळायला वृद्धिमान साहाने चक्क दिला नकार; काय आहे प्रकरण

डिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार अश्विनने 4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. पहिल्या डावातील 13वे षटक टाकणाऱ्या अश्विनने शेवटच्या चेंडूवर विरोधी फलंदाज राजकुमारला कीपरच्या झेलद्वारे बाद केले. मात्र राजकुमारने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद घोषित केले.

त्यानंतर लगेचच अश्विनने रिव्ह्यू घेऊन थर्ड अंपायरच्या निर्णयाला आव्हान दिले. दरम्यान अश्विन मैदानावरील पंचांशी वाद घालतानाही दिसला. मात्र, पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाने नाबाद घोषित केले. खंर तर थर्ड अंपायरने सांगितले होते की बॅट आणि बॉलमध्ये खूप अंतर आहे आणि ज्यावेळी चेंडू बॅट्समनमधून जात होता, तेव्हाच बॅट्समनची बॅट जमिनीवर होती.

R Ashwin Video
Virat Kohli : विराटच्या स्टोरीमुळे नवा वाद? रोहित अन् द्रविडच्या गच्छंतीचा दिला सिक्रेट संदेश

या सामन्यात त्रिचीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 19.1 षटकात सर्वबाद 120 धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेतले. याशिवाय अश्विन, सुबोथ भाटी आणि सर्वन कुमार यांनी २-२ बळी घेतले.

धावांचा पाठलाग करताना डिंडीगुल ड्रॅगन्सने 14.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. संघासाठी सलामीवीर शिवम सिंगने सर्वात मोठी 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.