R Ashwin Ind vs Wi 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. पहिल्या दिवसाचा हिरो होता तो म्हणजे फिरकी मास्टर आर अश्विन. ज्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आला.
वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळण्यासाठी अश्विनने विंडीज संघावर एकामागून एक ब्रह्मास्त्र सोडले. त्याने 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि अनेक विक्रम केले. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वगळण्यात आल्याने फिरकी मास्टरला दु:ख झाले. अश्विनने याबद्दल सांगितले की. मी फायनलसाठी पूर्णपणे तयार होतो. प्लेइंग इलेव्हनचा निर्णय अश्विनच्या अपेक्षेविरुद्ध होता, याचा अंदाज यावरून लावता येईल. आता विंडीजविरुद्ध आपला पंजा काढून त्याने कर्णधार आणि कोचला आरसा दाखवला आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर अश्विन म्हणाला, 'WTC फायनलबद्दल मला खूप वाईट वाटले. आम्ही दोनदा फायनलमध्ये पोहोचलो आणि जिंकू शकलो नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्ध येथे नवीन सायकलची चांगली सुरुवात करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. अशी कामगिरी करून संघाने नवीन हंगामाची शानदार सुरुवात केल्याचा मला खूप आनंद आहे.
WTC फायनलमध्ये वगळल्यानंतर अश्विन काय म्हणाला?
अंतिम फेरीत वगळण्यात आल्यावर अश्विन म्हणाला की, 'मी याबाबत यापूर्वीही बोललो आहे. मी फायनलसाठी सर्व प्रकारे तयार होतो. मी शारीरिक सरावही केला होता आणि योजनाही बनवल्या होत्या. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल आणि शेवटी कळत की तुम्ही सामना खेळणार नाही, तेव्हा स्वतःला कसे सिद्ध कराल?
तो पुढे म्हणाला, 'या जगात असा एकही क्रिकेटर किंवा कोणीही माणूस नाही जो न पडता उंचीवर गेला आहे. जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा ते तुम्हाला दोन संधी देते. एकतर तुम्ही त्याबद्दल बोला आणि तक्रार करा. किंवा खाली जाऊन तुम्ही त्यातून काय तरी शिका, मी एक आहे जो त्यातून शिकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.