नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेने (South Africa) जानेवारी 2023 मधील ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील वनडे मालिकेतून (ODI Series) माघार घेतली कारण त्यांच्या देशात होणाऱ्या टी 20 फ्रेंचायजी लीग (T20 League) आणि ही वनडे मालिका एकत्र येत होत्या. यानंतर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) एक भीती बोलून दाखवली. त्याने वनडे क्रिकेटचे भविष्य (Future Of ODI Cricket) धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. त्याने वनडे सामना सुरू असताना टीव्ही बंद करत असल्याचे देखील मान्य केले.
आता क्रिकेट चाहते हे टी 20 क्रिकेटकडे जास्त आकर्षित होत आहेत. याचबरोबर कसोटी क्रिकेटचेही पुनरूज्जीवन सुरू झाले आहे. विशेष करून इंग्लंडने चार कसोटी सामने जिंकल्यापासून त्यातील चाहत्यांचा रस वाढत आहे. मात्र वनडे क्रिकेटची भविष्य गटांगळ्या खात आहे. यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेतून माघार घेत भर टाकली आहे.
दरम्यान, अश्विन एका पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'वनडे क्रिकेटचे वैशिष्ठ त्यातील चढ - उतार आहे... सॉरी होतं. लोकं वेळात वेळ काढून सामना शेवटपर्यंत पहायचे. वनडे क्रिकेट प्रकारात गोलंदाजांसाठी काही तरी असायचं. आता जरी मी क्रिकेटवेडा आणि क्रिकेट खेळत असलो तरी वनडे सुरू असताना मी टीव्ही बंद करायचो. यामुळे क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटबद्दल भीती वाटते. सामन्यातील ते चढ उतार कुठे तरी लुप्त होतील. त्यानंतर ते क्रिकेट राहणार नाही. तो फक्त एक टी 20 क्रिकेटचा वाढलेले फॉरमॅट होऊन जाईल.'
अश्विनला वाटते वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एका डावात एकच चेंडू असला पाहिजे. अश्विन म्हणाला की, 'हा प्रासिंगकतेचा प्रश्न आहे. मला असे वाटते की वनडे क्रिकेटला त्याची प्रासंगिकता शोधावीच लागले. वनडे क्रिकेटला त्याची जागा शोधलीच पाहिजे. मला वाटते की चेंडू बाबत आपल्याला पुन्हा काही निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे फिरकीपटूंना फायदा होईल. चेंडू रिव्हर्स स्विंग देखील होईल. खेळासाठी हे खूप गरजेचे आहे.'
तो पुढे म्हणाला, 'आपण 2010 मध्ये जे चेंडू वापरत होतो ते वापरले पाहिजेत. मला नाही वाटत की आता आपण ते चेंडू वापरतो. मी वनडे क्रिकेट पाहतच लहानाचा मोठा झालो आहे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.