अश्विनच्या टी २० वर्ल्डकपमधील समावेशाबाबत गांगुलीने केला मोठा खुलासा

अश्विनच्या टी २० समावेशाबाबत गांगुलीने केला मोठा खुलासा
Sourav Ganguly Virat Kolhi
Sourav Ganguly Virat Kolhiesakal
Updated on

नवी दिल्ली : आर. अश्विन (R. Ashwin) हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) एक हुकमी एक्का आहे. मात्र बराच काळ तो टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. अखेर त्याला युएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघात (Team India) स्थान मिळाले. अश्विनच्या टी 20 वर्ल्डकप संघातील समावेशावेळी अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीनेच अश्विनचा टी 20 वर्ल्डकप संघात कोण्याच्या सांगण्यावरून समावेश झाला हे स्पष्ट केले. (R Ashwin T20 World Cup Inclusion Sourav Ganguly big statement)

Sourav Ganguly Virat Kolhi
विराट कोहली - रोहित शर्मा एकमेकांचे तोंड पाहणार नाहीतच का?

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) 'बॅक स्टेज विथ बोरिया' या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'मला अश्विन पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल याची खात्री नव्हती. मात्र विराट कोहलीला (Virat Kohli) अश्विन टी 20 वर्ल्डकप संघात हवा होता. आर. अश्विनला (R. Ashwin) वर्ल्डकपमध्ये जी काही संधी मिळाली ती त्याने वाया घालवली नाही.'

Sourav Ganguly Virat Kolhi
सर्वात यशस्वी ODI कॅप्टन कोण, सौरभ की विराट?

गांगुलीने सांगितले की, अश्विनचे कसोटी रेकॉर्ड पाहिले तर ते जबरदस्त आहे. अश्विन (R. Ashwin) हा एक जबरदस्त खेळाडू आहे हे मला सांगण्याची गरज नाही. त्याचे रेकॉर्डच ते सांगते. तुम्ही त्याची कारकिर्द संपुष्टात आली आहे असे म्हणू शकत नाही. अश्विन सध्या जी कमागिरी करत आहे ते पाहून मला आश्चर्य वाटत नाही. सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत. कानपूर कसोटीनंतर राहुल द्रविडचे (Rahul Dravid) वक्तव्य बघा. अश्विनला त्याने सर्वकालीन सामना जिंकून देणाऱ्या महान खेळाडूमध्ये त्याची गणना केली आहे. अश्विनची गुणवत्ता पाहण्यासाठी रॉकेट सायन्स लागत नाही. मी जे बघतो त्याचेच कौतुक करतो.'

Sourav Ganguly Virat Kolhi
मँचेस्टर सिटीने लीड्स युनायटेडचा उडवला धुव्वा

टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) देखील आर. अश्विनवर स्तुतीसुमने उधळी होती. राहुल द्रविडने आर. अश्विन हा एक कसोटी क्रिकेटमधील महान मॅच विनरपैकी एक आहे असे वक्तव्य केले होते. मध्यंतरी आर. अश्विन आणि विराट कोहली यांच्यात संघर्ष सुरु असल्याचे वृत्त आले होते. त्या पार्श्वभूमीवर सौरभ गांगुली(Sourav Ganguly) यांनी केलाला नवा खुलासा वेगळीच गोष्ट सांगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.