गुजरात विरुद्ध राजस्थान मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरने संपूर्ण खेळाचं चित्रच बदलून गेलं. राजस्थानचा पराभव झाला असून गुजरातने बाजी मारली. राजस्थानच्या या पराभवासोबत क्रिकेट जगतात भारताचा स्पिनर आर अश्विनच्या रिटायरमेंटची चर्चा रंगली आहे. आणि त्याने याबद्दल खुलासादेखील केला आहे.
यंदाच्या सीझनमध्ये अश्विन मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटत आहे. त्याने आत्तापर्यंत ११ घेतल्या आहेत. तर त्याने १८३ धावांते संघासाठी योगदान दिले आहे.
अश्विनने या आयपीएलमध्ये बरेच काही केले आहे. ज्यात मधल्या षटकांमध्ये फिनिशर तर कधी हिटरची भूमिका बजावली आहे.
त्याने त्याच्या क्रिकेट करिअरवर भाष्य केलं. “एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून माझा संबंध आहे तोपर्यंत हे खूप वेगळे वर्ष आहे. खरे सांगायचे झाले तर, आयपीएलमधील हे माझे सर्वात आनंदाचे वर्ष आहे. क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावरही त्याने भाष्य केलं.
'संघाच्या कामगिरीशी किंवा पात्रतेशी काहीही संबंध नाही. मी माझ्या कामगिरीचा किती आनंद घेतला याबद्दल आहे. ज्या दिवशी मी खेळाचे प्रयोग करणे बंद करेन, ज्या दिवशी माझी आवड संपेल, माझा खेळ संपेल. असे मोठे वक्तव अश्विनने यावेळी केलं आहे.
अश्विनने भारताकडून खेळलेल्या 86 कसोटी सामन्यांमध्ये 442 विकेट्स घेतल्या आहेत, तर 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 बळी घेतले आहेत. अश्विनने भारताकडून 51 टी-20 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, अश्विनच्या एकूण टी 20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 279 सामन्यांत 275 विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतके आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.