Chess World Cup 2023: दिग्गज खेळाडूला धोबीपछाड देत प्रज्ञानानंदा फायनलमध्ये; विश्वविजेत्या कार्लसनला देणार आव्हान

FIDE Chess World Cup: प्रज्ञानानंदाने सोमवारी फाईड विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रोमहर्षक विजय खेचून इतिहास रचला.
प्रग्नानंद
प्रग्नानंदSakal
Updated on

बुद्धिबळ विश्वचषक 2023 मध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने धमाल सुरूच ठेवली आहे. प्रज्ञानानंदाने सोमवारी फाईड विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रोमहर्षक विजय खेचून इतिहास रचला. त्याने टायब्रेकमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला.

कारुआना हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. दोन सामन्यांची क्लासिकल मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यानंतर 18 वर्षीय प्रज्ञानानंदाने अनुभवी ग्रँडमास्टरला चांगली साथ दिली. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंदा हा दुसरा भारतीय आहे.

आता अंतिम फेरीत भारतीय ग्रँडमास्टरचा सामना नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने प्रज्ञानानंदाचे त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर लिहिले, “प्राग (प्रज्ञानानंद) अंतिम फेरीत पोहोचला आहे! त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो कारुआनाचा पराभव केला आणि आता त्याला मॅग्नस कार्लसनचे आव्हान असेल. किती छान कामगिरी आहे!”

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रज्ञानानंद अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इतिहास घडवला जात आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. FIDE विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदाचे अभिनंदन. प्रज्ञानानंदांनी प्रचंड चिकाटी दाखवली. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. भारतातील युवा आपला ठसा उमटवत आहे. प्रज्ञानानंद, फायनलसाठी शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.