Rachin Ravindra : आधी इंग्लंड, भारत आता ऑस्ट्रेलिया; 23 वर्षाच्या रचिनने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये दिग्गजांना घेतलं अंगावर

Rachin Ravindra
Rachin Ravindraesakal
Updated on

Rachin Ravindra :

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये उपविजेत्या न्यूझीलंडने आतापर्यंतच्या 6 सामन्यात दमदार कामगिरी करत गेल्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपदावर आपलाच अधिकार होता हे अधोरेखित केले. न्यूझीलंडला कर्णधार केन विलियमसन दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकला आहे.

मात्र त्याच्या जागी संघात खेळत असलेल्या रचिन रविंद्रने धमाकेदार कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने सहा इनिंगमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहे.

Rachin Ravindra
Asian Para Games : @111! आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी करत एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने इतिहास रचला

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात न्यूझीलंडसमोर 389 धावांचे आव्हान होते. मात्र रचिन रविंद्रने 89 चेंडूत 116 धावांची खणखणीत शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासीठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याने आपली ही शतकी खेळी 5 षटकार 9 चौकार मारले.

रचिनने गतविजेत्या इंग्लंडविरूद्ध शतकी 96 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावरच किवींनी गेल्या वर्ल्डकप फायनलचा काही अंशी बदला घेतला. यानंतर रचिनने भारताविरूद्ध 87 चेंडूत 75 धावांची अर्धशतक खेळी केली होती. तर नेदरलँड्सविरूद्ध देखील त्याने 51 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

आता त्याने चेस करताना ऑस्ट्रेलियाविरूद्ध 89 चेंडूत 116 धावा करत पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

Rachin Ravindra
World Cup 2023 : ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' गगनचुंबी षटकार अन् श्रेयस अय्यरचा विक्रम मिळाला धुळीस

रचिन बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडच्या 40.2 षटकात 6 बाद 293 धावा झाल्या होत्या. त्यानंतर जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी झुंजार फलंदाजी करत सामन्यात रंगत भरली. नीशमने 58 धावांची अर्धशतकी खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र शेवटच्या दोन चेंडूवर 6 धावांची गरज असताना नीशम धावबाद झाला अ्न 389 धावा करणारे कांगारू फक्त 5 धावांनी विजयी झाले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.