डिव्हिलियर्स सह दिग्गजांवर वर्णभेदाचे आरोप

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये उठले वर्णभेदाचे वादळ; एबी डिव्हिलियर्ससह दिग्गजांवर आरोप
Graeme Smith and ab de villiers
Graeme Smith and ab de villiersesakal
Updated on

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट (South Africa Cricket) वर्तुळात पुन्हा एकदा वर्णभेदाच्या (Racism) आरोपांनी डोके वर काढले आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय आणि राष्ट्र उभारणी आयोगाचे प्रमुख डुमिसा एन यांनी 235 पानी अहवाल सादर केला आहे. यात क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे प्रशासन, माजी कर्णधार आणि सध्याचे निर्देशक ग्रॅम स्मिथ(Gram Smith), संघाचे सध्याचे प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) आणि माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Graeme Smith and ab de villiers
दादाचा राग कोहलीपेक्षा वाईट; द्रविड-शास्त्रींनाही भिडलाय

या आयोगाने संघटनेत स्थायी लोकपाल नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) आणि माजी गोलंदाज पॉल अ‍ॅडम्सने (Paul Adams) त्यांना वर्णावर आधारित टोपन नाव देण्यात आले होते असे सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण बाहेर आले आहे. आयोगाने ज्यावेळी मार्क बाऊटर 2012 मध्ये निवृत्त झाला त्यावेळी त्याच्या जागी थामी सोलेकिलेची निवड न करण्यावरही चिंता व्यक्त केली आहे. हे वर्णभेदी (Racism) असल्याचेही त्यांनी नमुद केले.

Graeme Smith and ab de villiers
Ashes : ऑस्ट्रेलियाला धक्का; कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीला मुकला

तर 2015 च्या भारत दौऱ्यावर एबी डिव्हिलियर्सनेही (AB de Villiers) वर्णभेद केल्याचा आरोप या अहवालात केला आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात खाया जोंडो (Khaya Zondo) याचाही समावेश होता. मात्र भारताविरुद्ध डीन एल्गरला खेळण्याची संधी दिली गेली. त्यावेळीही या बाबत वाद झाला होता. त्यावेळी एबी डिव्हिलियर्सने हे वृत्त फेटाळले होते.

टी 20 वर्ल्डकपवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डिकॉक याने देखील वर्णभेदाचा निषेध नोंदवण्यासाठी आपले गुडघे वाकवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याला संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. याचबरोबर तो सामनाही त्याला खेळता आला नव्हाता. मात्र डिकॉकने नंतर खुलासा केला. क्विंटन डिकॉकच्या जागी टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()