Rafael Nadal : आता ऑलिंपिकसाठी परत येईन,नदाल ; फ्रेंच स्पर्धेतून तंदुरुस्ती आजमावता आली

आपली मक्तेदारी असलेल्या रोलँड गॅरोवरून फ्रेंच स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले असले तरी याच कोर्टवर आपण ऑलिंपिक पदकासाठी परतणार आहोत, असा विश्वास राफेल नदालने व्यक्त केला. टेनिसमधील महान खेळाडूंमध्ये स्थान असलेला नदाल गेल्या १८ महिन्यांपासून विविध दुखापतींचा सामना करत आहे.
Rafael Nadal
Rafael Nadalsakal
Updated on

पॅरिस : आपली मक्तेदारी असलेल्या रोलँड गॅरोवरून फ्रेंच स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले असले तरी याच कोर्टवर आपण ऑलिंपिक पदकासाठी परतणार आहोत, असा विश्वास राफेल नदालने व्यक्त केला. टेनिसमधील महान खेळाडूंमध्ये स्थान असलेला नदाल गेल्या १८ महिन्यांपासून विविध दुखापतींचा सामना करत आहे. फ्रेंच स्पर्धेत सर्वाधिक १४ वेळा विजेतेपद मिळवण्याचा अनुभव आणि वर्चस्व असतानाही यंदाच्या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

दुखापतींमुळे नदालला २०२३ मधील बहुतेक स्पर्धांवर पाणी सोडावे लागले होते. शरीराच्या विविध अवयवांच्या दुखापतींचा तो सामना करत आहे, अशा परिस्थितीत फ्रेंच स्पर्धेत खेळण्याचा त्याने प्रयत्न केला; पण काल पहिल्या फेरीत तीन सेटमध्येच त्याचे आव्हान संपुष्टात आले. आपले शरीर कसे साथ देईल, याचा अंदाज मलाही नव्हता; पण जुलै-ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मला खेळायचे आहे.

शरीरातील विविध दुखापतींमध्ये चढ-उतार होत राहिले आहेत. सकाळी उठतो तेव्हा कधी कधी साप मला चावत आहे, असे वाटते तर कधी कधी वाघाबरोबर माझी झुंज सुरू आहे, अशी जाणीव होते, अशा शब्दात नदालने आपल्या दुखापतींचे वर्णन केले. अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत मी सकारात्मकता बाळगली आणि येथे आलो. आज तंदुरुस्त असेन किंवा उद्या चांगल्याप्रकारे खेळू शकेन, असे वाटायचे; परंतु पूर्ण तंदुरुस्ती जाणवत नव्हती, अखेर फ्रेंच स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला जोखता आले.

आता मला प्रथम ऑलिंपिकसाठी मानसिकता तयार करायची आहे. मी आत्ताच ठामपणे काही सांगू शकत नाही; परंतु ऑलिंपिक खेळणे हे माझे ध्येय आहे, असे नदाल म्हणाला. नदाल तिसऱ्या ऑलिंपिक पदकासाठी प्रयत्नशील आहे. त्याने २००८च्या बीजिंग आणि त्यानंतर रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवलेली आहेत. गेल्या स्पर्धेपेक्षा फ्रेंच स्पर्धेत खेळताना तंदुरुस्तीबाबतचा आत्मविश्वास होता; परंतु समोर झ्वेरेव हा मातब्बर खेळाडू असल्याने मी कमी पडलो, अशी कबुलीही नदालने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.