Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

लाल मातीचा बादशहा असे सामाज्र निर्माण करणाऱ्या राफेल नदालला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले.
Rafael Nadal
Rafael Nadalsakal
Updated on

पॅरिस - लाल मातीचा बादशहा असे सामाज्र निर्माण करणाऱ्या राफेल नदालला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले. त्याने दुखापतीनंतर पुनरागमन केले असले तरी ही त्याची अखेरची फ्रेंच ओपन असल्याचेही बोलले जात आहे.

अनेक दुखापतींचा सामना करत नदालने जिद्दीने यंदा फ्रेंच स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु चौथ्या मानांकित अलेंक्झँडर झ्वेरेवचा अडथळा तो पार करू शकला नाही. झ्वेरेवने हा सामना ६-३, ७-६ (७-५) ६-३ असा पराभव केला.

या फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालने सर्वाधिक १४ वेळा विजेतेपद मिळवलेले आहे. गतवर्षी तो दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता.

नदालसाठी ही लढत सोपी नसणार हे उघड होते. एरवी या स्पर्धेत बादशहाप्रमाणे वावरणाऱ्या नदालचा आत्मविश्वास काहीसा कमी वाटत होता. पहिला सेट सहज गमावला असला तरी या कोर्टवर अशा पिछाडीनंतर त्याने अनेक सामने आणि विजेतेपदही मिळवलेले आहे.

दुसऱ्या सेटमध्ये त्याने आपला सर्व अनुभव पणास लावला. ५-५ बरोबरी साधत हा सेट पुढे टायब्रेकरवर नेला; परंतु तेथे त्याची लढत थोडक्यात कमी पडली. त्यानंतर नदाल पाठीमागेच पडत गेला.

नदालच्या तुलनेत झ्वेरेवचे पहिल्या सर्व्हिसवर चांगले नियंत्रण होते. त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या सर्व्हिसचा वेगही अधिक होता. तसेच ब्रेक पाँईंटचे रूपांतर यशामध्ये करण्यात तो ३३% : १८% इतका पुढे होता. त्याचे विनर्सही ४४:३३ असे होते. नदालसाठी मैदानी फटके मात्र अफलातून होते; परंतु ते त्याला विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.