दुखऱ्या पायाने जोकोविचला मात देणारा नदाल सेमी फायनलबद्दल म्हणतो...

Rafael Nadal Give Indication About Future After Defeat Novak Djokovic in French Open
Rafael Nadal Give Indication About Future After Defeat Novak Djokovic in French Openesakal
Updated on

पॅरिस : राफेलन नदालने (Rafael Nadal) फेंच ऑपनच्या (French Open) उपांत्यपूर्वी फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) पराभवाची धूळ चारली. त्याने जोकोविचला 6-2, 4-6, 6-2, 7-6(4) असे पराभवूत केले. नदाल आता आपल्या आवडत्या रोलँड गार्रोस स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. तो विक्रमी 22 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या जवळ पोहचला आहे. मात्र जोकोविचला हरवल्यानंतर राफेल नदालने भविष्याबाबतचे (Future) मोठे संकेत दिले. त्याच्या दुखऱ्या पायामुळे तो पुढे किती काळ खेळणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Rafael Nadal Give Indication About Future After Defeat Novak Djokovic in French Open
क्रिकेटच्या मैदानात पुन्हा भारत पाकिस्तान लढतीचा थरार, संघाची झाली घोषणा

राफेल नदाल जोकोविचविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर म्हणाला की, 'मला माहिती नाही पुढे काय होईल. मला वाटते की ही स्पर्धा खेळता यावी यासाठी आम्ही तयारी केली होती. मात्र यानंतर काय होईल हे मला माहिती नाही.' 35 वर्षाच्या नदानले सांगितले की त्याचा खासगी डॉक्टर स्पर्धेवेळी उपलब्ध असल्याने त्याने मैदानावर उतरण्यासाठी मदत केली. त्यामुळे दुखऱ्या पायनिशी देखील पॅरिसमध्ये नदाल खेळू शकला मात्र भविष्याबाबत तो साशंक आहे.

नदाल म्हणाला की, 'माझ्या पायाला दुखापत झाली आहे याची मला जाणीव आहे. जर याच्यात सुधारणा झाली नाही किंवा काही तोडगा निघाला नाही तर ते माझ्यासाठी खूप कठिण जाईल.' नदाल आता सेमी फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी भिडणार आहे.

Rafael Nadal Give Indication About Future After Defeat Novak Djokovic in French Open
MS Dhoni ला भेटताच दिव्यांग फॅनला आले रडू, धोनी अश्रू पुसत म्हणाला...

दरम्यान, नदाल जोकोविचला पराभूत केल्यानंतर म्हणाला, 'शेवटी माझ्यासाठी ही खूप भावनिक रात्र होती. मात्र हा फक्त उपांत्यपूर्व फेरीतील सामना होता. मी अजून काही रात्री सामने खेळू शकतो. त्यामुळे मी दोन दिवसांनी पुन्हा कोर्टवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. रोलँड गार्रोस मधील अजून एक सेमी फायनल खेळणे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.'

राफेल नदालला तो सेमी फायनल एकाग्रतेने खेळणार आहे की एकाग्रतेच्या कमतरतेमुळे त्याला झ्वेरेव विरूद्धचा सामना गमवावा लागणार आहे असे विचारल्यानंतर तो म्हणाला की, 'मी सेमी फायनलमध्ये खराब खेळलो किंवा मी सेमी फायनल हरली तर माझा पराभव एकाग्रतेच्या कमतरतेमुळे नसेल. तेवढा अनुभव माझ्याकडे आहे. मी भावनेच्या भरात वाहून जाणारा व्यक्ती आणि खेळाडू नाही. मी खूप स्थीर आहे मी फक्त भावनिकतेने विचार करतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.