French Open : सलग 12 सेट जिंकणाऱ्या जोकोविचला नदाल रोखणार?

झुंजार नदाल जोकोविचविरूद्ध खेळणार विक्रमी सामना
Rafael Nadal Novak Djokovic quarterfinal in French Open Tennis
Rafael Nadal Novak Djokovic quarterfinal in French Open Tennisesakal
Updated on

राफेलन नदालला (Rafael Nadal) फ्रेंच ओपन टेनिस (French Open) स्पर्धेत चौथ्या फेरीत चांगलाच घाम गाळावा लागला. त्याला फेलिक्स औगेर एलिआसिमेने 3-6, 6-3, 6-2, 3-6, 6-3 अशा पाच सेटपर्यंत झुंजवले. मात्र अखेर राफेल नदालने अनुभवाच्या जोरावर सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. आता नदाल फ्रेंच ओपनमधला आपला विक्रमी 59 वा सामना नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) विरूद्ध खेळणार आहे.

Rafael Nadal Novak Djokovic quarterfinal in French Open Tennis
डॅरेन सॅमीला मिळाला पाक सरकारचा 'सितारा - ए - इम्तियाज' पुरस्कार

रविवारी झालेल्या थरारक सामन्यात नदालने रॉलँड गार्रोस स्पर्धेतला तिसरा पाच सेट पर्यंत चाललेला सामना खेळला. राफेल नदाल क्ले कोर्टचा बादशाह आहे त्याने आतापर्यंत जिंकलेल्या 21 ग्रँडस्लॅममधील 13 ग्रँडस्लॅम हे फ्रेंच ओपन टायटल आहेत. फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालने आतापर्यंत तीनवेळाच पराभव सहन केला आहे. या तीन पराभवापैकी दोन पराभव हे नोव्हाक जोकोविचने दिले आहेत. विशेष म्हणजे जोकोविचने आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदं जिंकली आहे. त्याला आता राफेल नदालच्या 21 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. गेल्या वर्षी नोव्हाक जोकोविचने राफेल नदालचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता.

Rafael Nadal Novak Djokovic quarterfinal in French Open Tennis
तुम्हालाही हार्दिक पांड्या व्हायचं असेल तर त्याच्या यशाची पार्श्वभूमी जाणून घ्या...

फ्रेंच ओपनचा गतविजेता नोव्हाक जोकोविचने विक्रमी 16 वेळा रोलँड गार्रोसची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात त्याने दुसऱ्या सेटमध्ये पिछाडी भरून काढत अर्जेंटिनाच्या 15 व्या सीडेड डिएगो स्वार्त्जमनचा 6-1, 6-3, 6-3 अशा तीन सेटमध्ये पराभव केला. यंदाच्या वर्षी फ्रेंच ओपनमधील आतापर्यंत जोकोविचने आपले सर्व 12 सेट जिंकले आहेत. चार सामन्यात त्याने फक्त 30 गेम्स गमावले आहेत. रविवारच्या सामन्यात जोकोविच दुसऱ्या सेटमध्ये 3-0 ने पिछाडीवर पडला होता. मात्र त्यानंतर त्याने सलग सात गेम्स आपल्या नावावर करत सेट जिंकला तसेच तिसऱ्या सेटमध्येही 1-0 अशी आघाडी घेतली. जोकोविचने सलग 13 वर्षे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 2016 आणि गतवर्षी फ्रेंच ओपन जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.