US Open 2022 : युएस ओपन पुरूष एकेरीत स्टार टेनिसपटू राफेल नदालने फाबियो फॉगनिनीचा 2-6, 6-4, 6-2, 6-1 असा पराभव केला. विशेष म्हणजे धक्कादायक सुरूवातीनंतर राफेल नदालने झुंजार खेळ केला. मात्र समन्याच्या शेवटी शेवटी त्याच्या नाकातून रक्त येत होते. तरी देखील राफेल नदालने चौथा सेट जिंकत सामना खिशात टाकला. (Rafael Nadal overcame bloody nose Defeat Fabio Fognini in US Open 2022)
पहिल्या सेटमध्ये फॉगनिनीने राफेल नदालवर 4 - 2 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्याने पहिला सेट देखील जिंकला. त्यावेळी सात वर्षापूर्वी झालेल्या आर्थर अॅशे स्टेडियमवरील सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या. सात वर्षापूर्वी स्पेनच्या राफेल नदालला इटलीचा फाबियोने पराभव केला होता.
मात्र युएस ओपनच्या सामन्यात राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे झुंजार पुनरागमन करत पुढेचे तीन सेट जिंकले. दरम्यान सामन्याच्या चौथ्या सेटमध्ये राफेल नदाल 3 - 0 असा आघाडीवर असताना त्याची स्वतःचीच रॅकेट त्याच्या नाकावर जोरात आदळली. त्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे 22 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफाला मेडिकल ब्रेक घ्यावा लागला. त्यानंतर त्याच्या नाकाला पट्टी लावण्यात आली आणि त्याने सामना पूर्ण करत जिंकला.
दरम्यान, सामना संपल्यानंतर मुलाखतीवेळी राफेल नदाल म्हणाला, 'मी जवळपास दीड तास खेळत होतो मात्र मी माझे सर्वश्रेष्ठ देऊ शकत नव्हतो. ही माझ्या कारकिर्दितील सर्वात वाईट सुरूवात होती. असं ज्यावेळी घडतं त्यावेळी तुम्हाला सकारात्मक रहावे आणि सबुरीने घ्यावे लागते. सामना खूप वेळ चालला.' राफेल नदाल आता युएस ओपनमध्ये रिचर्ड गॅसक्वेटशी भिडणार आहे. रिचर्डने सर्बियाच्या मिओमीर केकमानोव्हिचचा 6-2, 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.