Wimbledon | 'मी खूप दुःखी आहे' म्हणत नदालची सेमी फायनलमधून माघार

Rafael Nadal pulled out Wimbledon semi-final Due To abdominal strain
Rafael Nadal pulled out Wimbledon semi-final Due To abdominal strainESAKAL
Updated on

लंडन : सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालने (Rafael Nadal) प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील सेमी फायनलमधून माघार घेतली आहे. यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच ओपन जिंकून 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या नदालने दुखापत असतानाही विम्बल्डनची (Wimbledon) सेमी फायनल गाठली होती. त्याचा मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या निक कर्गिओसशी (Nick Kyrgios) होणार होता. मात्र गेल्या सामन्यात नदालच्या पोटाचा स्नायू (Abdominal Strain) दुखावला. त्यामुळे त्याला मेडिकल ब्रेकही घ्यावा लागला होता. आता त्याने सेमी फायनलमधून माघार घेतली.

Rafael Nadal pulled out Wimbledon semi-final Due To abdominal strain
ENG v IND : पहिल्या सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय; मालिकेत 1-0 ची आघाडी

36 वर्षाचा राफेल नदाल म्हणाला की, 'मी विम्बल्डनमधून माघार घेत आहे. माझा पोटाचा स्नायू दुखावला असून ही दुखापत खूप वेदना देत आहे.' तो पुढे म्हणाला, 'मी या वेदना घेऊन दोन सामने जिंकण्याची कल्पनाच करू शकत नाही. माझ्या दृष्टीने टायटलपेक्षा आनंद महत्वाचा आहे. मी खेळातून दोन ते तीन महिन्यासाठी बाहेर फेकला जाण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही. मी खूप दुःखी आहे.'

Rafael Nadal pulled out Wimbledon semi-final Due To abdominal strain
Malaysia Masters | सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल

राफेल नदालने यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच ओपन जिंकत दमदार सुरूवात केली होती. त्याला रॉड लॅव्हेर यांनी 1969 मध्ये केलेल्या एका कॅलेंडर वर्षातील सर्व ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. जेव्हा राफेल नदालने विम्बल्डनच्या सेमी फायनलमधून माघार घेतली त्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू कर्गिओस हा 2003 नंतर विम्बल्डन फायनलमध्ये पोहचणारा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी मार्क फिलिपोऊसिसने ही कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.