नदाल कोर्टपासून दूर; सहा आठवड्यांचा ब्रेक घेण्याची नामुष्की

Rafael Nadal
Rafael NadalSakal
Updated on

स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल (Rafael Nadal) दुखापतग्रस्त झाला असून पुढील जवळपास सहा आठवडे त्याला कोर्टपासून बाहेर रहावे लागणार आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील फायनल लढतीत टेलर फ्रिट्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला काही दिवस कोर्टवर उतरता येणार नाही. मागील वर्षीही दुखापतीमुळे त्याला अनेक स्पर्धेला मुकावे लागले होते. आता पुन्हा त्याच्यावर विश्रांती घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

Rafael Nadal
राहुलच्या संघात 7 कोटींच्या 'वाघा'च्या बदल्यात 1 कोटींचा 'छावा'

'कॅडेना सेर'च्या वृत्तानुसार, दुखापतीसंदर्भात नदाल म्हणाला की, ही चांगली बातमी नाही. असं काही होईल असं वाटलं नव्हतं. हंगामाची दमदार सुरुवात झाल्यानंतर निराशा पदरी पडली आहे. आता धैर्याने या संकटाचा सामना करुन कमबॅक करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.

Rafael Nadal
फ्लावर समझे क्या...आफ्रिकेला लोळवत बांगलादेशनं रचला इतिहास

रविवारी इंडियन वेल्स स्पर्धेत टेलर फ्रिट्ज विरुद्धच्या लढतीत नदाल पूर्वीसारखा दिसलाच नाही. त्याला श्वास घेण्याचाही त्रास होत होता. सामन्यावेळी तो छातीवरुन हात फिरवतानाही पाहायला मिळाले होते.

दुखापतीतून कमबॅक करत नदालने रचला होता विश्वविक्रम

या वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अर्थात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याला मात देत विश्वविक्रम रचला होता. दोन सेटमध्ये पिछाडीवर राहून त्याने सामना आपल्या बाजूनं फिरवला. मेदवेदेव विरुद्ध पाच तास 24 मिनटे चाललेल्या लढतीत त्याने 2-6, 6-7 (5), 6-4, 6-4, 7-5 अशी बाजी मारली होती. या विजयासह स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस स्टार रॉजर फेडररचा 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम मागे टाकत त्याने 21 व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.