Rafael Nadal News : ऑस्ट्रेलियन ओपनमधून नदालची माघार, पुन्हा दुखापतीमुळे झाला बेजार!

Rafael Nadal Australian Open 2024 News | 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफेल नदाल जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परतल्यानंतर आठवडाभरात पुन्हा झाली दुखापत
Rafael Nadal withdraws from Australian Open 2024 Marathi News
Rafael Nadal withdraws from Australian Open 2024 Marathi Newssakal
Updated on

Rafael Nadal withdraws from Australian Open 2024 : 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफेल नदाल जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परतल्यानंतर आठवडाभरात पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. स्नायूंच्या किरकोळ दुखापतीमुळे त्याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतली.

ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडल्याची माहिती नदालने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो स्पेनला परतला आहे. तो गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून पण दुखापतीमुळे तो राऊंड ऑफ 64 मध्येच बाहेर पडला होता.

Rafael Nadal withdraws from Australian Open 2024 Marathi News
Ranji Trophy : तिसऱ्या दिवशी मणिपूरचा खेळ खल्लास! महाराष्ट्र संघाचा एकतर्फी विजय; अंकित बावणे ठरला 'सामनावीर'

नदालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली की, "सर्वांना माझा नमस्कार, ब्रिस्बेनमधील शेवटच्या सामन्यादरम्यान माझ्या स्नायूमध्ये थोडीशी समस्या आली होती. मी मेलबर्नला गेल्यावर एमआरआय केला. आणि मला यापूर्वी जिथे दुखापत झाली होती, तिथेच ही दुखापत झालेली नाही, जी चांगली गोष्ट आहे. फक्त स्नायूवर सूक्ष्म झीज झाली आहे. सध्या मी पाच सेटचे सामने खेळायला तयार नाही. मी माझ्या डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि काही उपचार, विश्रांती घेण्यासाठी स्पेनला परत जात आहे.

Rafael Nadal withdraws from Australian Open 2024 Marathi News
Virat-Rohit बाबतच्या अपडेटमुळे उडाली खळबळ! निवडकर्त्यांना दोघेही का नको आहेत संघात?

आठवडाभरापूर्वी ब्रिस्बेन ओपनमध्ये पुनरागमन करणाऱ्या नदालला शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनकडून 3 तास 25 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.