राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! T20 वर्ल्ड कपनंतर स्वीकारणार कार्यभार

Ravi-Shastri-Rahul-Dravid
Ravi-Shastri-Rahul-Dravid
Updated on
Summary

शुक्रवारी राहुल द्रविडने बीसीसीआयच्या प्रस्तावावर होकारार्थी उत्तर दिल्याचं समोर येत आहे. यामुळे आता राहुल द्रविड टी २० वर्ल्ड कपनंतर रवि शास्त्री यांची जागा घेईल.

भारतीय क्रिकेट संघाची द वॉल अशी ओळख असलेला माजी फलंदाज राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राहुल द्रविडने बीसीसीआयच्या प्रस्तावावर होकारार्थी उत्तर दिल्याचं समोर येत आहे. यामुळे आता राहुल द्रविड टी २० वर्ल्ड कपनंतर रवि शास्त्री यांची जागा घेईल.

दुबईत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडसोबत बैठक केली. त्यावेळी द्रविडला टी २० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी तयार केलं. त्यामुळे आता रवि शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळणार यावर शिक्कामोर्तब झाले. राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यास २०२३ पर्यंत त्याच्याकडे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी असेल. याशिवाय गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हांब्रे यांची निवड करण्यात आली आहे.

राहुल द्रविडने प्रशिक्षक पदासाठी नकार दिला होता. मात्र बीसीसीआयने अनेक प्रयत्न करून अखेर त्याला यासाठी तयार केलं आहे. तसंच बीसीसीआयच्या विनंतीला मान देत राहुल द्रविड प्रशिक्षक होण्यासाठी तयार झाल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबाबत बीसीसीआय़कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Ravi-Shastri-Rahul-Dravid
IPL 2021: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार!

सध्या राहुल द्रविड बेंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. तसंच बीसीसीआय़ने प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात दिलेली नाही. आता राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेण्याआधी लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदाचा राजीनामा देईल असं म्हटलं जात आहे.

Ravi-Shastri-Rahul-Dravid
Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

वर्ल्ड कपनंतर सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह इतर सपोर्टिंग स्टाफचा कार्यकाळ संपणार आहे. तर विराट कोहलीसुद्धा टी २० चे कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.