द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेटमधले 'मनमोहन सिंग'

Happy Birthday Rahul Dravid: राहुल द्रविडने कॉमेंटरी बॉक्समध्ये ज्ञान पाजळले नाही
Rahul Dravid Birthday
Rahul Dravid Birthdayesakal
Updated on

भारताचा सर्वात दुर्लक्षित स्टार खेळाडू म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid). राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात लढवय्या खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र त्याची ही लढवय्या वृत्ती त्याच्या शांत आणि संयत स्वभावामुळे कायम झाकोळली गेली. सचिन तेंडुलकरच्या एरामध्ये जन्माला आल्यामुळे त्याच्या कामगिरीची दखल ही कायम दुय्यम दर्जाचीच राहिली आहे. सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्रईव्हच्या मोहात पडलेल्या पिढीला राहुल द्रविडच्या सॉलिड डिफेन्स कधीही ग्लॅमरस वाटला नाही. त्यामुळे राहुल द्रविडचे क्रिकेट खेळत असतानाचे योगदान त्या काळात फारसे नावाजले गेले नाही. काही अंशी त्याचा 'मनमोहन सिंग' (Manmohan Singh) झाला असे म्हणता येईल. अशा भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) 'मनमोहन सिंग' अर्थात राहुल द्रविडचा आज 49 वा वाढदिवस आहे. (Rahul Dravid Birthday)

Rahul Dravid Birthday
सिद्धार्थच्या स्पष्टीकरणावर सायनाचे वडील भडकले

मात्र 'ऊपर वाले के घर में देर है अंधेर नही' मनमोहन सिंग पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपता संपता म्हणाले होते की इतिहास माझ्याकडे सध्याच्या माध्यमांपेक्षा दयाळू नजरेने बघेल. आजही देशात कोणतीही आर्थिक समस्या उद्भवली तरी मनमोहन सिंग यांच्याकडेच आशेने बघतो. असाच प्रकार काहीसा राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) बाबतीत झाला आहे. ज्यावेळी तो खेळत होता त्यावेळी त्याच्या संयमी आणि दिवसभर खेळल्या जाणाऱ्या खेळीकडे टिंगल टवाळीच्या नजरेने पाहिले गेले. त्याच्या चेंडू आणि धावांमधील मोठ्या तफावतीवर विनोदी नजरेनेच पाहिले गेले. प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वाहवा होत असते. तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो. बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा मारा झेलणारी, सर्व पुढे नायक ठरणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करणारी तटबंदी तिथेच असते स्थितप्रज्ञ.

Rahul Dravid Birthday
शाहरुख-जुहीचा मास्ट्रर स्ट्रोक; कॅप्टन्सीसाठी मुंबईकराला हेरलं

जसजसा या गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सकतो तसतसे योद्धे कालवश होतात. मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी, तोफगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते. ती या इतिहासाची साक्ष देत असते. त्यावेळी या तटबंदीचे महत्व उमजते. ही तटबंदी नसती तर आपले हे गौरवशाली योद्धे पराक्रम गाजवू शकले असते का? असा प्रश्नही आपल्या मनाला शिवून जातो. राहुल द्रविड ही अशीच अनेक तोफगोळ्यांच्या खुणा घेऊन जगणारी ऐतिहासिक भिंत आहे. (Rahul Dravid The Wall) ही भिंत ज्यावेळी निवृत्त झाली त्यावेळीचा काळ आठवा. त्याला साधा फेअरवेल सामनाही मिळाला नाही. नंतर त्याला अश्चर्यकारकरित्या एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा संघात घेतले आणि त्याचा निरोपाचा सामना 'अरेंज' केला गेला.

Rahul Dravid Birthday
'कोर्टातील' विजय अधिक रोमांचक; जोकोविचच्या आईची प्रतिक्रिया

राहुल द्रविडने (Rhul Dravid Retirement) याबाबत कधी नाराजीचा सूर लावल्याचे तुम्हाला आठवते का? नाही ना! कारण भारताची भिंत आहेच अशी निस्वार्थ, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर. मात्र एक गोष्ट खरी आहे की राहुल द्रविडला जेवढा आदर तो खेळत असतना मिळाला नाही तेवढा आदर तो निवृत्त झाल्यानंतर मिळाला. कारण राहुल द्रविडने आपले वेगळेपण निवृत्तीनंतरही जपले. क्रिकेटर निवृत्त झाला की तो गलेलठ्ठ मानधन घेऊन कॉमेंटरी बॉक्समधून आपले ज्ञान पाजळायला मोकळा असतो. मात्र राहुल द्रविडने तो मार्ग निवडला नाही. त्याने भारतीय क्रिकेटची वेगळ्या प्रकारे सेवा करण्याचा निर्णय घेतला.

त्याने भारतीय क्रिकेटच्या भविष्यावर (Future Of Indin Cricket) लक्ष केंद्रीत केले. त्याने प्रसिद्धीच्या झोतात न असणाऱ्या 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक होणे पसंत केले. भारताकडे आता निदान तीन संघ तयार होतील एवढी बेंच स्ट्रेंथ तयार आहे. याचे बरेच श्रेय राहुल द्रविडला देखील जाते. राहुल द्रविडचा भारतीय क्रिकेटचा बेस पक्का करण्याचा निर्णय ही त्याची खेळण्याची शैली दर्शवतो. जर तुमचा डिफेन्स (Defence) तगडा असेल तर तुम्ही धावांचे मोठमोठे इमने आरामात बांधू शकता. भविष्यात भारतीय क्रिकेट वेगळ्याच उंचीवर न्यायचे असेल तर आधी भारतीय क्रिकेटचा बेस पक्का असणे गरजेचे आहे. हा बेसच राहुल द्रविडने (Rahul Dravid) पक्का करण्याचे काम केले.

Rahul Dravid Birthday
पुजारा-अजिंक्यला अजूनही किंमत; कोहली दाखवणार खेळवण्याची हिंमत

राहुल द्रविडने आयपीएलच्या धडाकेबाज, ग्लॅमरस दुनियेत देखील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) सारख्या संस्थेची शान आणि महत्व अबाधित ठेवले. राहुल द्रविड आता भारतीय वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक झाला आहे. (Indian Mens Team Coach Rahul Dravid) तो स्वतः भारतीय वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक झालेला नाही. त्याची इच्छा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच काम करण्याची होती. मात्र राष्ट्रीय संघात काही अडचणी निर्माण झाल्या. संघातील कथित दुफळी, वाद आणि हेवेदावे भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला हादरे देत आहेत. ही प्रतिमा वाचवण्यासाठीच एकदा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रभावी डिफेन्स वापरण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.