दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत एका अर्थाने चौकारच ठोकला आहे. या विजयासह विराट कोहलीच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये.
भारतीय संघाचे नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिकेत (South Africa) दोन कसोटी सामने जिंकणारा तो भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टीम इंडियाला पहिला विजय नोंदवून दिला होता. त्याच्याशिवाय 2010-11 च्या दौऱ्यात धोनीच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने कसोटी सामना जिंकला होता.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत सध्याच्या घडीला आठवी मालिका खेळत आहे. आतापर्यंत या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 21 सामने खेळवण्यात आले आहेत. यात चार सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. भारतीय संघाने एकही मालिका जिंकलेली नाही. याआधी 2017-18 च्या दौऱ्यात विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला होता. पण ही मालिका दक्षिण आफ्रिकेनं 2-1 अशी जिंकली होती. द्रविड आणि कोहली यांचा विक्रम सेम टू सेम आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 2010-11 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली होती. 2013-14 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियााल 1-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
द्रविडच्या नावे खास विक्रम
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2006-07 च्या दौऱ्यात जोहन्सबर्गचं मैदान मारलं होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 123 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सेंच्यरियनटच्या मैदानात 113 धावांनी विजय नोंदवला आहे. कॅप्टन आणि कोच अशा दोन्ही पातळीवर दक्षिण आफ्रिकेत संघाला विजय मिळवून देण्याचा खास आणि कमालीचा विक्रम द्रविडच्या नावे झालाय. क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम होतात आणि ते मोडतातही. पण द्रविडचा हा विक्रम मोडणे थोडं अवघडच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.